शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : खरीप हंगामात भासणार डीएपी खताचा तुटवडा! गतवर्षीपेक्षा ३ हजार मे. टनने कमी डीएपी साठा मंजूर

By रवी दामोदर | Updated: April 3, 2023 16:26 IST

जिल्ह्याला ८५ हजार मे. टन खतसाठा मंजूर

अकोला : जिल्ह्याला खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी संचालकांकडे केली होती. त्यानुसार ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सार्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताच्या मागणीला गतवर्षीपेक्षा ३ हजार मेट्रिक टनने कात्री लावली असून, केवळ १२ हजार ३० मेट्रिक टन खताला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात डीएपी तुटवड्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी खरीप हंगामासाठी डीएपीचा जिल्ह्याला १५ हजार २८९ मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला होता.

रब्बी हंगाम संपुष्टात आला असून, शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. खरिपाच्या तयारीसाठी जिल्ह्याला खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी संचालकांकडे केली होती. त्यानुसार ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन खरिपासाठी मंजूर झाले असून, लवकरच रासायनिक खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. खरीप हंगाम अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, बळीराजा तयारीत व्यस्त आहे.

कृषी विभागाकडून जिल्ह्याला यंदा ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. शिवाय बियाणे-कृषी निविष्ठांची मागणी शासनाकडे केली असून, अद्याप मंजुरीबाबत प्रतीक्षा आहे. हा खतांचा साठा एप्रिल ते सप्टेंबर या खरीप हंगामासाठी लवकरच उपलब्ध होणार असून, या काळात टंचाई भासल्यास खरीप पेरणीचे क्षेत्र पाहून वाढीव मागणी करणार असल्याचीही माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.असे आहे मंजूर खतांचे आवंटन!खतांचे नाव             मंजूर साठा (मे. टन)

युरिया                          २०,९७०डीएपी                          १२,०३०

एमओपी                       ३०००एसएसपी                      २०,६९०

संयुक्त खते                    २८,७४०एकूण                            ८५४३०

सोयाबीन बियाणांची टंचाई होण्याची शक्यता!जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सार्वाधिक सोयाबीनची पेरणी होते. गतवर्षी उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला होता, तसेच जिल्ह्यात बियाणे महोत्सव राबविण्यात आल्याने घरगुती बियाणांना शेतकऱ्यांची पसंती मिळाली होती; परंतु यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा घटला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी