शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला सवरेपचार रुग्णालय : रुग्णाच्या महिला नातेवाईकासह सफाई कर्मचारी आढळला आक्षेपार्ह स्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:56 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. नऊमध्ये एक सफाई कामगार व त्याच वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाची महिला नातेवाईक मंगळवार, २३ जानेवारी रोजी रात्री स्वच्छतागृहात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे वॉर्ड क्र. ९ मध्ये मंगळवारी रात्री घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. नऊमध्ये एक सफाई कामगार व त्याच वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाची महिला नातेवाईक मंगळवार, २३ जानेवारी रोजी रात्री स्वच्छतागृहात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षक व वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांनी या दोघांना रंगेहात पकडून त्याबाबतची तक्रार अधिष्ठातांकडे केली असून, यासंदर्भात चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.सवरेपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. नऊ हा औषधशास्त्र विभागाचा पुरुष रुग्णांसाठी असलेला कक्ष आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान या वॉर्डातील स्वच्छतागृहात काही हालचाली होत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. तेथील कर्मचार्‍यांनी हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या कानावर घातला. सुरक्षारक्षकांनी स्वच्छतागृहात जाऊन पाहिले असता, एक सुरक्षारक्षक व रुग्णाची महिला नातेवाईक त्यांना आढळून आले. यावेळी सुरक्षारक्षकांनी सफाई कामगारास चोप देऊन त्याला बाहेर काढले. घटनास्थळी आक्षेपार्ह साहित्यही आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वॉर्डात मोठी खळबळ उडाली होती. याबाबत सुरक्षारक्षक व वॉर्डात कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांनी सदर सफाई कर्मचार्‍याविरुद्ध अधिष्ठातांकडे रीतसर तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी दिवसभर सवरेपचार रुग्णालय परिसरात रात्री घडलेल्या प्रकाराची खमंग चर्चा होती.

चौकशी समिती गठितमंगळवारी घडलेल्या या प्रकाराची अधिष्ठातांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. अस्वार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. नेताम व अधिसेविका ग्रेसी मरीयम यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कारवाईची दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयCrimeगुन्हा