शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Akola: यंदा रब्बीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढणार, मान्सून विलंबाने दाखल झाल्याचा परिणाम

By रवी दामोदर | Updated: September 18, 2023 12:51 IST

Akola: अकोला जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे.

- रवी दामोदरअकोला - जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. मान्सून विलंबाने दाखल झाल्याने मूग, उडीद पिके बाद झाली. परिणामी रब्बी क्षेत्र वाढले असून, त्यामध्ये सार्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे असणार आहे. यंदा रब्बी हंगामात १ लाख ५८ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र २० ते २५ टक्क्यांनी वाढले असून, तब्बल १ लाख २६ हजार ४६८ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

गत तीन-चार वर्षांपासून खरीप हंगामात होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. नुकसान झालेले क्षेत्र रब्बीमध्ये वाढत आहे. यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने उडीद, मूग पिके बाद झाली, तर सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे यंदाही रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात पावसाची तूट आहे, परंतु प्रकल्पांमध्ये मुबलक साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लहान, मोठे प्रकल्प आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, मोठ्या प्रकल्पांचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणीयंदा रब्बी हंगामातील क्षेत्र वाढण्याचा अंदाज असल्याने कृषी विभागामार्फत नियोजन केले आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण येऊ नये, यासाठी रब्बी हंगाम २०२३-०२४ करिता तब्बल ५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४१ हजार ६११ क्विंटल सार्वजनिक, तर १२ हजार १८७ क्विंटल खासगी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कृषी विभागामार्फत महाबीजकडे ३६ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून, त्यामध्ये २५ हजार क्विंटल हरभरा बियाण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी