शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:21 IST

सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाची तपासणीशिक्षण विभागाकडून कारवाईचा इशाराकारवाई मात्र शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही. विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नावापुरता प्रवेश घेऊन शिकवणी वर्गांना महत्त्व देतात. कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा प्रवेश क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तुम्ही केवळ प्रवेश घ्या, उपस्थितीचे आम्ही पाहू, असे सांगत होते. त्यामुळे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना वर्षभर दांडी मारतात आणि परीक्षेच्या तोंडावर केवळ प्रॅक्टिकलपुरते उगवतात. अकोला जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. ही बाब माध्यमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदा जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याबाबत बजावले होते. कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थ्यांची ७0 टक्के उपस्थिती नसल्यास त्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, असा इशारा दिला होता आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीची झाडाझडती शिक्षण विभागाने घेण्यास सुरुवात केली खरी; परंतु झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभाग नेहमीच विद्यार्थी नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देतो; परंतु पुढे एकाही महाविद्यालयावर शिक्षण विभाग कारवाई करण्याची धमक दाखवित नाही. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांचे चांगलेच फावत आहे. शिक्षण विभाग केवळ इशारा देतो; परंतु कारवाई करीत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा निश्‍चिंत असतात. त्यामुळे आतातरी शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थी उपस्थित राहतात की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पथक नेमले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना उपस्थिती दिसणार नाही, त्यांच्यावर निश्‍चितच कारवाई करण्यात येईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग.

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिकcollegeमहाविद्यालय