शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पोलिसांचा 'नो मास्क नो व्यवहार' पॅटर्न आता संपूर्ण राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 09:51 IST

नो मास्क नो व्यवहार हा उपक्रम आता राज्यभरात सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

- सचिन राऊत

अकोला : अकोलापोलिसांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेला ‘नो मास्क नो व्यवहार, हा उपक्रम आता राज्यभरात सुरू होणार आहे. अकोला पोलिसांची या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन नो मास्क नो सवारी, नो मास्क नो बुक, नो मास्क नो मेडिकल, नो मास्क नो किराणा, यांसह नो मास्क नो व्यवहार हा उपक्रम आता राज्यभरात सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सहकाऱ्यांसह पेट्रोल पंप, पुस्तक विक्रीची दुकाने, ठोक किराणा बाजार, भाजी बाजार, आॅटो या ठिकाणावर नो मास्क नो पेट्रोल डीझल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील, नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू केली. विविध संघटनेचा सहभाग तसेच पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीने अल्पावधीतच ही मोहीम राज्य स्तरावर राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन मोहिमेचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्यमध्ये आता नो मास्क नो व्यवहार, ही मोहीम राबविण्याच्या स्पष्ट सूचना शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. असा राहणार उपक्रमआता विना मास्क कोणताच व्यवहार होणार नाही. कोणीही व्यापारी किंवा सेवा देणारे किंवा सेवा घेणारी कोणतीच व्यक्ती विना मास्क राहणार नाही. विना मास्कच्या कोणत्याच व्यक्तीसोबत आता कोणताही व्यवहार होणार नाही. गत १५ दिवसांपासून अकोला पोलीस राबवित असलेल्या नो मास्क नो....... मोहिमेला मिळालेली पावतीच आहे. मास्क न घालणे सामाजिक अपराधनुकतेच एका याचिकेवर निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने एखादी व्यक्ती मास्क न घालता गर्दीत फिरत असेल तर तो एक सामाजिक अपराध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नो मास्क नो.... मोहिमेचे महत्त्व अधोरेखित होते.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या