शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:49 IST

अकोला: ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ हा विजेता ठरल्याने शुक्रवारी झालेल्या पोलीस मुख्यालयातील गुन्हे बैठकीत स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सत्कार केला.

अकोला: ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अकोला पोलीस संघ हा विजेता ठरल्याने शुक्रवारी झालेल्या पोलीस मुख्यालयातील गुन्हे बैठकीत स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सत्कार केला.अकोला पोलीस संघाने बास्केटबॉल, फुटबॉल, खो-खो, या खेळामध्ये प्रथम क्रमांक, हॉकी, कबड्डी, हॅण्डबॉल यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तसेच अकोला महिला पोलीस यांनीही कबड्डी व खो-खो या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. अकोला पोलीस टीमचे प्रतिनिधित्व करणारे राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके व कोच सलीम खान यांचाही विशेष कामगिरीमुळे सत्कार करण्यात आला. पोलीस कर्मचारी फराज शेख यांना बेस्ट प्लेयर आॅफ द इयर, पोका रियाज अहेमद फुटबाल बेस्ट प्लेयर, अब्दुल फईम, मोईन खान यांनी फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक पटकावला. अरक सागर देशमुख यांनी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून बेस्ट अ‍ॅथलेटिक्स प्लेयर म्हणून पुरस्कार पटकावला. पोकाँ. इम्रान शहा यांनी १00 मीटर उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानेश्वर गीते याने १५00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, पोकाँ. मनोज अंभोरे यांनी बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक, इरफान खान यांनी वेट लिफ्टिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. महिला खेळाडू पूजा भटकर यांनी धावण्याच्या स्पर्धेत, तृष्णा घुमन यांनी बॉक्सिंगमध्ये शुभांगी खंडारे यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख गौरव भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने, सुनील सोनवणे, नीलेश देशमुख यांच्यासह ठाणेदार उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Police Head Quarterअकोला पोलीस मुख्यालयPoliceपोलिस