शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : दोन किलो सोने लुटमार प्रकरणाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:03 IST

अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चोरट्यांचा रामदास पेठ पोलिसांना शोध लागला. या चार चोरट्यांना ठाणे पेालिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

ठळक मुद्देचार आरोपी ठाणे जिल्हय़ातील, अटकेसाठी पोलीस रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चोरट्यांचा रामदास पेठ पोलिसांना शोध लागला. या चार चोरट्यांना ठाणे पेालिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. प्रशांत कुरियरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरियर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हे कुरियर बॉय म्हणून कामाला आहेत. ते मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी २0१७ रोजी रात्री मुंबई येथून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. ८ फेब्रुवारीच्या पहाटे अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एम एच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले असता पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी काकड यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र, जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटत असताना पोलिसांना या चोरट्यांची माहिती मिळाली नाही. दरम्यान, रामदास पेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील या चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची क बुली दिली. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलीस रवाना झाले आहेत.

५0 हजारांचे ठेवले होते बक्षिसआठ महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही चोरट्यांची माहिती मिळत नसल्याने त्यांची माहिती देणार्‍यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक गुन्हे शाखेच्या हातात काहीच लागले नाही. या चार चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजही राज्यभर पाठविले. मात्र, पोलिसांचा तपास जैसे-थेच होता. मात्र, ठाणे पोलिसांनी एक टोळी अटक केली असून, या टोळीतील सदर चार जणांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणाची कबुली दिली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा