शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : प्रशांत निंघोट खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:44 IST

अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्‍या चार आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली असून, यामधील दोन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर गुरुवारी अटक केलेल्या अश्‍विन सिरसाट, अंकुश सपकाळ या दोघांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे.

ठळक मुद्देदोन आरोपींची कारागृहात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्‍या चार आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली असून, यामधील दोन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर गुरुवारी अटक केलेल्या अश्‍विन सिरसाट, अंकुश सपकाळ या दोघांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे.  माधव नगरातील गजानन विहार अपार्टमेंटमधील रहिवासी प्रशांत सुखलाल निंघोट हे माजी आमदार राम पंडागळे यांच्या भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. गुरुवार, १४ डिसेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांत निंघोट घरी असताना भीम नगरातील रहिवासी आकाश ऊर्फ पव्या सिरसाट, आशिष ऊर्फ आशुल्या सिरसाट, प्रेमा सिरसाट, अंकुश सपकाळ यांच्यासह चार अनोळखी युवक त्यांच्या घरासमोर येऊन प्रशांत निंघोट यांना घराबाहेर घेऊन गेले. यावेळी प्रशांत निंघोट यांनी त्यांचा मित्र अमर इंगळे याला सोबत घेतले. रिंग रोडवरील पिल कॉलनीजवळ प्रशांत निंघोट व अमर इंगळे या दोघांसोबत आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट, प्रेमा, अंकुश व इतर चार युवकांनी वाद घातला. या वादातून सदर आरोपींनी निंघोट व इंगळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये प्रशांत निंघोट यांचा जागेवरच मृत्यू झाला तर अमर इंगळे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले; मात्र पोलिसांनी आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट या दोघांना अटक केली असून, त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर गुरुवारी अश्‍विन सिरसाट व अंकुश सपकाळ या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे. अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. फरार असलेल्या चार अज्ञात आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :Khadan Police Stationखदान पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा