शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:30 IST

अकोला : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या नावाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सबबीखाली शहरात बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देम्हणे, उदरनिर्वाहासाठी दोन लाखांची मदत२0 रुपयांच्या अर्जाची सर्रास विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या नावाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सबबीखाली शहरात बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील झेरॉक्स सेंटरमध्ये २0 रुपयांत संबंधित अर्जांची मोठय़ा धडाक्यात विक्री सुरू असून, या प्रकरणाची गंभीर दखल भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी घेतली आहे. शहरातील वय वर्षे ६ व त्यापुढील युवतींनी केंद्र शासनाकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत अर्ज सादर केल्यास त्यांना शैक्षणिक खर्चासह उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा गवगवा करत बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या कानाकोपर्‍यातील झेरॉक्स सेंटरवर २0 रुपयांमध्ये अर्जांची विक्री केली जात आहे. सदर अर्जासोबत फोटो, मोबाइल क्रमांकासह महत्त्वाचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देश आहेत. पोस्ट कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बाल विकास विभागाच्या पत्त्यावर अर्ज सादर केले जात आहेत. सदर अर्जांवर प्रभागातील नगरसेवकांची स्वाक्षरी बंधनकारक असल्यामुळे दिवस उजाडताच नगरसेवकांच्या घरी नागरिकांची लगबग सुरू होत असल्याचे चित्र आहे. पक्षाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही अर्जांचे वितरण करण्याची सूचना नसल्यामुळे या प्रकरणाची भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

अफवांना ऊत२0 रुपयांचा अर्ज केंद्र शासनाकडे पाठविल्यास त्याबदल्यात मुलीला दोन लाखांची मदत मिळणार असल्याचा गवगवा होत असल्यामुळे सर्वसामान्यांची अर्ज खरेदीसाठी धावपळ सुरू झाल्याचे बोलल्या जात आहे. नागरिकांनी खातरजमा करूनच अर्जांची खरेदी करणे अपेक्षित असताना शहरात अफवांना ऊत आला आहे. 

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अभियानामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या अशा कोणत्याही प्रकारच्या अर्जांची आमच्याक डे माहिती उपलब्ध नाही. यासंदर्भात पक्षाकडे खातरजमा केली जात आहे. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. तूर्तास अकोलेकरांनी अफवांना बळी पडू नये. -किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष भाजपा 

टॅग्स :Akola cityअकोला शहरBJPभाजपा