शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न आता कोकण विभागातही

By atul.jaiswal | Updated: June 29, 2019 12:01 IST

अकोला: ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागानंतर आता कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनाथन यांनी ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई शहर व उपनगरांमध्येही या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार आहे.

- अतुल जयस्वालअकोला: भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून समोर आलेला ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागानंतर आता कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही राबविण्यात येणार आहे. अकोला पॅटर्न म्हणून हा उपक्रम दरवर्षी १ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत सर्व शाळांमध्ये साजरा करण्याचे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त सचिन कुर्वे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.मूळचे तामिळनाडू राज्यातील असलेले ए. एस. नाथन यांच्या ‘एक जन्म-एक वृक्ष’ या संकल्पनेस राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर हा उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने सध्या राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमाच्या यशानंतर नाथन यांनी ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ, नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, हिंगोली, सातरा व लातूर या १३ जिल्ह्यांपर्यंत एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम पोहचला होता. आता कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किमान एक झाड लावावे, अशा सूचना असून, यावर लक्ष ठेवण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांना ‘नोडल आॅफिसर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातही पोहचणार‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राज्यभरात पोहोचावा यासाठी नाथन प्रयत्नशील असून, ते विविध विभागांचे आयुक्त व विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेत आहेत. आतापर्यंत तीन विभागात हा उपक्रम राबविण्याबाबतचे निर्देश मिळविण्यात त्यांना यश आले आहे. आता पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम राबविण्याबाबतचे पत्र लवकरच मिळण्याची आशा असल्याचे नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाsocial workerसमाजसेवक