शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पंचायत समितीमधील वादग्रस्त शाखा अभियंता राऊतविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:30 IST

अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त शाखा अभियंता किशोर राऊत याने कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे पाच हजार बळजबरी हिसकले!निलंबनाची वारंवार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पंचायत समितीमधील बांधकाम विभागात कार्यरत असलेला वादग्रस्त शाखा अभियंता किशोर राऊत याने कंत्राटदाराच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कंत्राटदाराकडून तब्बल ७५ हजार रुपये उकळल्यानंतरही अभियंता राऊत याने पैशाची मागणी सुरूच ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.शासकीय कंत्राटदार अक्षय कुळकर्णी यांना लोणाग्रा येथील रस्ता बांधकामाचा कंत्राट देण्यात आला होता, सदरचा कंत्राट सहा लाख रुपयांमध्ये दिल्यानंतर अक्षय कुळकर्णी यांनी या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर देयक अकोला पंचायत समितीमध्ये सादर केले. देयक काढण्यासाठी शाखा अभियंता किशोर राऊत याच्याकडे अक्षय कुळकर्णी यांनी विनंती केली असता, राऊत याने पैशाची मागणी केली. देयकावर २५ टक्के द्यावेच लागणार असल्याचेही राऊत याने कुळकर्णी यांना सांगितले. त्यामुळे कुळकर्णी यांनी किशोर राऊतला ७५ हजार रुपये आधीच दिले होते, असे तक्रारीत नमूद आहे. मात्र, राऊत याने त्यानंतरही २५ हजार रुपयांची मागणी सुरूच ठेवली. मात्र, कुळकर्णी यांनी २५ हजार रुपये देण्यास नकार दिला. तहसील कार्यालयाजवळ राऊत व कुळकर्णी उभे असताना शाखा अभियंता राऊत याने कुळकर्णी यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकले. कुळकर्णी यांनी विरोध केला असता राऊतने देयक न काढण्याची धमकीही दिली. त्यामुळे पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याप्रकरणी कुळकर्णी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शाखा अभियंता किशोर राऊत याच्याविरुद्ध भांदवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. शाखा अभियंता राऊतला अटक करण्यात आलेली नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

निलंबनाची वारंवार कारवाईशाखा अभियंता किशोर राऊत वादग्रस्त असल्याची माहिती आहे. त्याच्यावर तीन ते चार वेळा निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अशा वादग्रस्त शाखा अभियंत्याकडून लुटमार सुरू असताना प्रशासन याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

संपत्तीची चौकशी करा!शाखा अभियंता किशोर राऊत याने प्रचंड माया गोळा केली असून, त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी कंत्राटदाराकडून करण्यात आली आहे. राऊतने नुकतेच गायगाव शेतशिवारात शेत घेतले असून, या शेतासह संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा