शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अकोला : वेळेपूर्वीच ‘ओपीडी’ बंद; रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:38 AM

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बाहय़ोपचार विभाग (ओपीडी)ची अधिकृत वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची असली, तरी नियमित वेळेपूर्वीच या विभागाचे द्वार रुग्णांसाठी बंद केले जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ओपीडी दुपारी १.३0 वाजताच बंद करण्यात आल्यामुळे उशिरा आलेल्या अनेक रुग्णांना आल्या पावली परत जावे लागले. दरम्यान, रुग्ण नसल्यामुळे ‘ओपीडी’ बंद करण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देदोनची वेळ असताना दीड वाजताच कवाडे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बाहय़ोपचार विभाग (ओपीडी)ची अधिकृत वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची असली, तरी नियमित वेळेपूर्वीच या विभागाचे द्वार रुग्णांसाठी बंद केले जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ओपीडी दुपारी १.३0 वाजताच बंद करण्यात आल्यामुळे उशिरा आलेल्या अनेक रुग्णांना आल्या पावली परत जावे लागले. दरम्यान, रुग्ण नसल्यामुळे ‘ओपीडी’ बंद करण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.पश्‍चिम विदर्भातील मोठय़ा शासकीय रुग्णालयांपैकी एक असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाचा जिल्हय़ातील गोरगरिबांना मोठा आधार आहे. केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा जिल्हय़ातूनही येथे मोठय़ा संख्येने रुग्ण येतात. ओपीडीची क्षमता १२00 रुग्णांची असली, तरी येथे दररोज जवळपास दोन हजारांवर रुग्ण उपचारासाठी येतात. मुळात या रुग्णालयात डॉक्टरांसह सर्वच पदे रिक्त असल्यामुळे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे ओपीडीचे वेळापत्रक कोलमडते. रुग्णालयाच्या ‘ओपीडी’ची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची आहे; परंतु या वेळा पाळल्या जात नाहीत. सकाळी १0 वाजेपर्यंत ओपीडीमधील अनेक कक्षांमध्ये डॉक्टरच येत नसल्याच्या तक्रारी आहेत. मंगळवार, १६ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच ओपीडीची कवाडे बंद झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. ओपीडी बंद झाल्यानंतर अपघात कक्ष सुरू असतो. या ठिकाणी मात्र अव्याहतपणे रुग्ण सेवा सुरू राहत असल्यामुळे रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

१ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणीयासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनीही याला दुजोरा दिला. दुपारी १ वाजेपर्यंत येणार्‍या रुग्णांची नोंदणी केल्या जाते. एक वाजेपर्यंत नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी साधारणत: २ वाजेपर्यंत चालते. मंगळवारी, दीड वाजताच नोंदणी झालेल्या रुग्णांची तपासणी संपल्यामुळे ओपीडीमधील डॉक्टर निघून गेले, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मनुष्यबळाचा अभावभारतीय वैद्यक परिषद (एमसीआय)च्या मानकानुसार या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात डॉक्टरपासून ते सफाई कामगारांपर्यंतची २२३६ पदे असणे गरजेचे आहे, तर वैद्यकीय महाविद्यालयात १११५ पदे असावयास हवी. परिस्थिती मात्र वेगळीच आहे. ओपीडीची क्षमता १२00 असताना दररोज दोन हजारांवर रुग्णांची नोंद होते. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे मोठय़ा संख्येने येणार्‍या रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय