शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी कावड यात्रेत फक्त राजराजेश्वराची पालखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 18:45 IST

कावड यात्रेत यावर्षी केवळ राजराजेश्वरांच्याच पालखीचा समावेश असेल.

अकोला : अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला श्रावण महिन्यात शहराचे पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा असलेल्या कावड यात्रेत यावर्षी केवळ राजराजेश्वरांच्याच पालखीचा समावेश असेल.पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थित बुधवारी झालेल्या बैठकीत शिवभक्तांनी या निर्णयाला एकमताने संमती दिली आहे.श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी होणारा कावड यात्रा महोत्सव हा अकोल्यातील सर्वात मोठा लोकोत्सव आहे यावर्षी १७ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवारी आहे. मात्र कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासनाने सर्व शिवभक्तांची बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली. दरवर्षी कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या मंडळानी यावर्षी कावड यात्रेत सहभाग न घेता केवळ मानाची पालखी असलेल्या श्री राजराजेश्वाराचीच पालखीला कावड यात्रेची परवानगी देण्यात यावी यावर सर्वांची एकमत झाले.  कावड उत्सवला ७६ वर्षाची परंपराशहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाºया पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फराळ आदी व्यवस्था उभारतात. दरवर्षी असणारे हे चित्र यावर्षी दिसणार नाही.

 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सणRajrajeshwar Templeराजराजेश्र्वर मंदिर