शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ऑनलाइन फसवणूक झालेल्या दोघांचे पैसे २४ तासांत परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:07 IST

अकोला : ऑनलाइन खरेदी करताना दोघांच्या खात्यातून परस्पर १ लाख ९ हजार ५00 रुपये काढून फसवणूक केल्यानंतर दोघाही ग्राहकांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी  संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून २४ तासांमध्ये त्यांचे पैसे परत मिळवून दिले. एवढेच नाही, तर गत तीन महिन्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे नऊ लाख रुपये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. 

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची माहिती तीन महिन्यांत नागरिकांचे नऊ लाख परत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ऑनलाइन खरेदी करताना दोघांच्या खात्यातून परस्पर १ लाख ९ हजार ५00 रुपये काढून फसवणूक केल्यानंतर दोघाही ग्राहकांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी  संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून २४ तासांमध्ये त्यांचे पैसे परत मिळवून दिले. एवढेच नाही, तर गत तीन महिन्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे नऊ लाख रुपये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. ढोणे कॉलनी शिवर येथे राहणारे सुधाकर मधुकर वानखडे यांनी १0 एप्रिल रोजी तक्रार दिली, की एका फायनान्स कंपनीतून कर्जावर मोबाइल विकत घेतला, त्यानंतर त्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले. मोबाइलचे टप्प्या-टप्प्याने पूर्ण पैसे दिल्यानंतरही त्यांना एका फायनान्समधून क्रेडिट कार्ड बंद करण्यात येत आहे. कार्ड सुरू ठेवायचे आहे का, अशी विचारणा झाली. त्यांनी होकार दिल्यावर फायनान्सकडून त्यांना सहा आकड्यांचा संदेश पाठविण्यात आला आणि हे आकडे बरोबर आहेत का, असे विचारले. त्यावर वानखडे यांनी होकार दिला. त्यांच्या खात्यातून ६४ हजार ५५0 रुपये काढण्यात आल्याचा संदेश आला. दुसरे प्रकरण माळीपुर्‍यात राहणारे सुधीर गणपत बंड यांचे आहे. त्यांनाही एका फायनान्स कंपनीतून फोन आला आणि तुमचे जुने कार्ड बंद होणार आहे. नवीन कार्ड मिळणार आहे, असे सांगून काही संदेश येतील, त्याची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले. नंतर पुन्हा संदेश आला आणि तुमच्या कार्डमधून ४५ हजार रुपयांच्या दोन वस्तू खरेदी केल्याचे सांगण्यात आल्यावर बंड यांना फसवणूक झाल्याचे कळले. वानखडे व बंड यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार केली. सायबर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण धुमाळ, पोलीस शिपाई अतुल अजने यांनी तातडीने दोन्ही तक्रारकर्त्यांच्या पैशांचा वापर करून फ्लिपकार्डवरून खरेदी केल्याचे लक्षात आल्यावर, त्यांनी फ्लिपकार्डच्या नोडल अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून करण्यात आलेल्या वस्तूंची डिलिव्हरी थांबविली आणि दोघांनाही त्यांचे पैसे परत मिळवून दिले. असे सांगत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हे सायबर पोलिसांचे मोठे यश आहे. पत्रपरिषदेचे संचालन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले. 

पोलिसांकडून आता विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन सुविधानागरिकांना आता पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, पोलीस व्हेरिफिकेशन यासह ध्वनिक्षेपक, आंदोलन, विविध संस्थांना लागणार्‍या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी पोलीस विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नागरिकांना आता पोलीस अधीक्षक कार्यालयात, पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. त्यांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. 

मी बँक अधिकारी बोलत आहे, असे सांगून ग्राहकाला खाते बंद होईल, कार्ड ब्लॉक होईल, अशी भीती दाखविण्यात येते; परंतु कोणतीही बँक एटीएम कार्डचा सोळा अंकी क्रमांक, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक, एक्स्पायरी दिनांक विचारत नाही. नागरिकांनी फोनवर अशी माहिती देऊ नये. - राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा