शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Akola: खामगाव-अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी

By अनिल गवई | Updated: May 6, 2023 12:52 IST

Akola: अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला.

 खामगाव - अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता दरम्यान टेंभूर्णा शिवारातील एका पेट्रोलपंपासमोर घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार अकोला येथील पाच जण दोन दुचाकीने खामगावकडे येत होते. दरम्यान, टेंभूर्णा शिवारातील एका पेट्रोलपंपासमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकी अनियंत्रित होऊन समोरील वाहनांवर जाऊन धडकल्या. यात एमएच ३० बीएस २२६५ या क्रमांकाच्या दुचाकीसह दुसरीही दुचाकी समोरील वाहनांवर जाऊन आदळल्याने दुचाकीवरील वासुदेव वानखडे वय ६० रा. धानोरा जि. अकोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संदेश देवराव तायडे, सविता देवराव तायडे दोघेही रा. मलकापूर जि. अकोला आणि संगीता सदानंद दामोदर रा. भौरद जि. अकोला जखमी झाले. तर एक युवक किरकोळ जखमी झाला.

घटनेनंतर नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणीअंती वासुदेव वानखडे यांना मृत घोषित केले. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला