शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ‘सीड बॉम्बिंग’साठी जिल्हा परिषदकडे निधीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 10:59 IST

प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेला यावर्षीही सुरुंग लावण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मंजूर अर्थसंकल्पातून झाला आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात वन जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी डोंगराळ भागात हेलिकॉप्टरद्वारे बियाणे फेकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गत दोन वर्षांपासून प्रयत्न चालविला. त्या प्रयत्नाला यावर्षीही सुरुंग लावण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मंजूर अर्थसंकल्पातून झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पदाधिकाऱ्यांऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. त्यावर पुढील सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.पर्यावरणातील विविध समस्या जंगलाचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातून फारसे काही हातात पडत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीऐवजी जंगलातच झाडांचे प्रमाण वाढवून जंगल क्षेत्र व वनाच्छादन वाढविण्याची संकल्पना गत काही वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांना सांगितली. जंगलात हेलिकॉप्टरद्वारे बियाणे फेकण्यासाठी (सीड बॉम्बिंग) जिल्हा परिषदेच्या विभागाकडे निधीची तरतूद करावी, पावसाळ्यात हा प्रयोग राबवावा, यासाठीचे नियोजनही झाले; मात्र यापूर्वी निधीची तरतूद महिला व बालकल्याण विभागाकडे करण्यात आली. त्या विभागाच्या आयुक्तांनी हा उपक्रम विभागाकडून राबविता येणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तो कागदावरच राहिला. ती वेळ यावर्षी पुन्हा येऊ नये, यासाठी नव्याने नियुक्त पदाधिकाºयांनी खबरदारी घेत जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाकडून ही योजना राबविण्याची तयारी केली. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचेही ठरले. तसे झाल्यानंतर मंजूर अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपये टोकन ठेवण्यात आले. हा प्रकार सत्ताधारी पदाधिकाºयांच्या निर्णय तसेच त्या पक्षाच्या नेत्यांच्या संकल्पनेला पुरता सुरुंग लावणारा ठरला आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदांच्या अर्थसंकल्पीय सभा शासनाने रद्द केल्या. त्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अर्थसंकल्प मंजूर करावा, तसेच येणाºया सर्वसाधारण सभेपुढे ठेवावा, असेही निर्देश दिले. त्यानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात हा प्रकार घडला आहे.

आता निधी वळविण्याचा तिढा

‘सीड बॉम्बिंग’साठी एक हजार रुपये टोकन तरतूद आहे. त्यासाठी निधी वळता करावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या काही उपक्रमांचा २५ ते ३० लाखांचा निधी त्यासाठी वळता करण्याची तयारी सत्ताधाºयांकडून होणार आहे; मात्र आधीच तरतूद केली असती तर हा प्रकार घडला नसता, यामुळे आता सत्ताधारी चांगलेच संतप्त झाले आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्याशी पदाधिकाºयांनी रक्तदान शिबिरप्रसंगी चर्चा केली. 

 अर्थसंकल्पात अनेक फेरबदलाने सत्ताधाºयांना डिवचले!

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांनी मंजूर केलेल्या तरतुदी, त्यानुसार अर्थ समितीने केलेल्या तरतुदी, अर्थ विभागानंतर शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरापर्यंत अर्थसंकल्पात अनेक फेरबदल झाले. त्यातून सत्ताधाºयांना डिवचण्याचाच प्रकार घडल्याची चर्चा आता जोर धरत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkola ZPअकोला जिल्हा परिषद