शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : तीन महिने उलटूनही स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांचे नामांकन नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:18 IST

अकोला : केंद्र शासनाने घोषित केल्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ साठी नामांकन सादर करण्याच्या सूचना शासनाने ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या; परंतु तीन महिने उलटूनही राज्यातील शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाही.

ठळक मुद्देस्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत शाळा अनभिज्ञकेंद्र शासनाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार नामांकनासाठी मुदत वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाने घोषित केल्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ साठी नामांकन सादर करण्याच्या सूचना शासनाने ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या; परंतु तीन महिने उलटूनही राज्यातील शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाही. स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत शाळा अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्यामुळे शासनाने नामांकन पाठविण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना सुरू केली. या पुरस्कारासाठी सर्वच राज्यांमधील शासकीय, खासगी शाळांकडून नामांकन मागविण्यात येतात आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था, उत्तम इमारत, नियमित स्वच्छता या निकषांच्या आधारावर शाळांची जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रारंभी जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या शाळेला राज्य स्तरावर संधी दिली जाते. राज्य स्तरावरील शाळांमधून काही शाळांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात येते. शासनाने राज्यातील शाळांना ७ सप्टेंबर रोजी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तीन महिने उलटून गेल्यानंतरही शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाहीत. या शाळांना पुरस्कारासाठी नामांकन पाठवता यावे. या दृष्टिकोनातून शासनाने आता ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत मुदत वाढविली आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ संदर्भात शाळांसाठी नामनिर्देशन करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून एमएचआरडीच्या संकेतस्थळावर आणि स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाइल अँपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

स्वच्छ पुरस्कार योजनेमध्ये शाळांचा सहभाग वाढावा आणि अधिकाधिक शाळांनी पुरस्कार योजनेसाठी नामांकन भरावे, यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. त्यामुळे शाळांनी तातडीने नामांकन सादर करावे. प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळा