शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेने सोशल मीडिया सेल गुंडाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:48 IST

सोशल मीडिया सेल मनपाने गुंडाळला असून, प्रशासकीय माहितीपेक्षा बिनकामाच्या संदेशाची देवाण-घेवाण संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला भोवल्याचे बोलल्या जात आहे.

अकोला: सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेच्या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनपा प्रशासनाने सोशल मीडिया सेलचे गठन केले होते. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून अकोला महापालिका, शहराचा इतिहास व सद्यस्थितीत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार होती. यासाठी नागपूर येथील प्रतिनिधीची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती. हा सोशल मीडिया सेल मनपाने गुंडाळला असून, प्रशासकीय माहितीपेक्षा बिनकामाच्या संदेशाची देवाण-घेवाण संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला भोवल्याचे बोलल्या जात आहे.आजच्या घडीला माहितीचे सर्वाधिक वेगवान माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिल्या जाते. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक व टिष्ट्वटरच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपºयातील माहितीचे आदान-प्रदान तातडीने होऊ शकते. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक आदी महापालिका त्यांची इत्थंभूत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देत आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अकोला मनपाचा पूर्वइतिहास, शहराची माहिती, मनपातील विविध विभागांची माहिती, तक्रार निवारण करणाºया टोल फ्री क्रमांकाची माहिती तसेच शासनाद्वारे सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सोशल मीडिया सेल कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. दैनंदिन ताज्या घडोमोडींमुळे प्रशासनाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे, साफसफाई राखण्यासाठी सूचना व समस्या निकाली काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे, असा यामागचा उद्देश होता. यासंदर्भात सत्ताधारी भाजपला संपूर्ण माहिती दिल्यानंतरच सोशल मीडिया सेल कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मीडिया सेलची जबाबदारी नागपूर येथील संस्थेला देण्यात येऊन कंत्राटी तत्त्वावर प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर कोठे माशी शिंकली देव जाणे, अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीतच हा सेल गुंडाळण्यात आला.महापौरांच्या हस्ते उद्घाटनसप्टेंबर २०१८ मध्ये मनपा प्रशासनाने कार्यान्वित केलेल्या सोशल मीडिया सेलचे महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते मनपाच्या मुख्य सभागृहात रीतसर उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी सत्तापक्षातील पदाधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSocial Mediaसोशल मीडियाAkolaअकोला