शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला महापालिकेने केलेली करवाढ नियमबाह्यच : विभागीय आयुक्तांच्या अहवालात नोंद - अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:31 IST

अकोला: मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे४० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ अपेक्षित नसताना प्रशासनाने ६० टक्के कर आकारणी केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्तांनी नोंदवल्याची माहिती अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली.मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रशासनाने रितसर निविदा प्रक्रिया न राबवता स्थापत्य कन्सलटन्सीला काम दिले.विभागीय आयुक्तांचा अभिप्राय ध्यानात घेता यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्यमंत्र्यांकडे घेतली जाणार आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे वेळ मागू,असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले.

अकोला: महापालिका प्रशासनाने नगररचना विभागाच्या ‘रेटेबल व्हॅल्यू’नुसार कर आकारणी केली नाही. मालमत्तांचे दर तीन वर्षांनी पुनर्मुल्यांकन करणे अपेक्षित होते. मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर लादलेली करवाढ नियमबाह्य असल्याचा मुद्दा भारिप-बहुजन महासंघाने सातत्याने लावून धरला. विभागीय आयुक्त कार्यालयात करवाढीच्या संदर्भात सादर केलेल्या अर्जावर मत नोंदवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी शासनाकडून अभिप्राय मागितला होता. शासनाच्या मंजूरीनंतर विभागीय आयुक्तांनी तेरा पानांचा अहवाल सादर केल्याची माहिती अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. नगररचना विभागाने दिलेल्या ‘रेटेबल व्हॅल्यू’नुसार मनपाने कर आकारणी करण्याची गरज होती. ४० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ अपेक्षित नसताना प्रशासनाने मनमानीरित्या ६० टक्के कर आकारणी केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्तांनी नोंदवल्याची माहिती अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली. करवाढ केल्यानंतर नागरिकांचे आक्षेप,हरकती निकाली काढण्याचे अधिकार केवळ महापालिका आयुक्तांना आहेत. कलम १५२ (क) नुसार मनपा आयुक्तांनी स्वत: सुनावणी घेऊन आक्षेप निकाली काढणे आवश्यक होते. याठिकाणी मनपा आयुक्तांनी अधिनस्थ अधिकाºयांना सुनावणीचे अधिकार दिले. अर्थात, नियमानुसार नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी घेतली गेली नसल्याचे दिसून येते. मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रशासनाने रितसर निविदा प्रक्रिया न राबवता स्थापत्य कन्सलटन्सीला काम दिले. प्रशासनाच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या घरात जाऊन मालमत्तांचे मोजमाप घेण्याचा अधिकार खासगी कंपनीला नसल्याची माहिती अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली. विभागीय आयुक्तांचा अभिप्राय ध्यानात घेता यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्यमंत्र्यांकडे घेतली जाणार आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे वेळ मागू,असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, उपाध्यक्ष जमिर उल्लाखान पठाण, बालमुकूंद भिरड, मनपा गटनेत्या अ‍ॅड.धनश्री देव, नगरसेवक बबलू जगताप, किरण बोराखडे, काशीराम साबळे, प्रसन्नजित गवई, गजानन गवई,शहर प्रमुख बुध्दरत्न इंगोले,अरूंधती शिरसाट, पराग गवई आदी उपस्थित होते.

संविधानाच्या संवर्धनाची गरज!काही राजकीय पक्षांकडून संविधान बचाव रॅली व संविधान पूजन केले जात आहे. हे सर्व फसवे प्रकार असल्याचे अँड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. संविधानाला धोका नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगत संविधानाच्या संवर्धनाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. 

शेतकर्‍यांनीच लुटीचं धोरण स्वीकारलं!प्रकल्पबाधित शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूच्या निमित्ताने भाजप असो वा काँग्रेस यांना शेतकर्‍यांशी काहीही घेणे-देणे नसल्याची  टीका अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी जातीच्या पुढार्‍यांनाच अवाजवी महत्त्व दिल्याचं सांगत खुल्या अर्थव्यवस्थेला शेतकर्‍यांचं सर्मथन होतं. या लुटीच्या अर्थव्यवस्थेचा हा बळी असून, त्याला कोणीही दोषी नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका