शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

रिलायन्स जिओ कंपनीविरोधात महापालिकेची पोलीस तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 17:19 IST

मनपा प्रशासनाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या परवानगीशिवाय शहरात फोर-जी केबलसाठी खोदकाम केल्या जात असल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत उशिरा का होईना, मनपा प्रशासनाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. कंपनीच्या खोदकामात रस्त्याचे नुकसान झाल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.शहरवासीयांना फोर-जी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सबबीखाली विविध मोबाइल कंपन्यांनी मनमानीरीत्या जागा दिसेल त्या ठिकाणी खोदकाम करण्याचा सपाटा लावला आहे. शहरात केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपाच्या परवानगीला ठेंगा दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. खोदकामाची परवानगी मागितल्यास कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे शुल्क जमा करावे लागते. सदर शुल्क जमा न करताच मनपाच्या बांधकाम विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा सर्व खेळ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गत दोन वर्षांत काही मोबाइल कंपन्यांनी विविध भागात सुमारे ४० किलोमीटर अंतरापेक्षा जास्त केबलचे जाळे टाकल्याची माहिती आहे. या बदल्यात मनपा प्रशासनाला किमान ३० कोटी रुपयांचा आर्थिक चुना लावण्यात आल्याचे दिसून येते. दिवस-रात्र खोदकाम करून रस्त्यालगत केबल टाकणाºया कंपन्यांना साधी विचारपूस न करणाºया बांधकाम विभागातील जबाबदार अधिकारी, उपअभियंता व कनिष्ठ अभियंते यांची प्रामाणिकता चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणाचा गवगवा होऊन सदर प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून बांधकाम विभागाने २३ डिसेंबर रोजी मनपाच्या परवानगीशिवाय खोदकाम करणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मानसेवी उपअभियंता कृष्णा वाडेकर यांनी सदर तक्रार दिली आहे.महापौरांनी दिले शुल्क वसुलीचे निर्देश महापौर अर्चना मसने यांनी फोर-जी केबलसाठी खोदकाम करणाºया स्टरलाइट टेक कंपनीकडून ‘रिस्टोरेशन चार्ज’ वसूल करण्याचे निर्देश सोमवारी मनपा आयुक्तांना जारी केले आहेत. महापौरांच्या निर्देशावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.रिलायन्सला परवानगी कधी?मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला २०१३ मध्ये १८ किलोमीटर अंतराचे फोर-जी केबल टाकण्यासाठी १२ कोटींच्या शुल्काची आकारणी केली होती. २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कंपनीला आकारलेल्या दंडाची सुमारे तीन कोटींची रक्कम माफ करीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कंपनीने १८ किलोमीटर अंतराचे काम आटोपले. २०१८ मध्ये खडकी भागात रिलायन्स कंपनीच्या खोदकामात मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे सदर खोदकामासाठी मनपाने रिलायन्सला कधी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित होऊन खुद्द प्रशासन संशयाच्या घेºयात सापडले आहे.

म्हणे खड्डे खोदले; केबल टाकलेच नाही!मनपाला ३० कोटींचा चुना लावणाºया विविध मोबाइल कंपन्यांनी खोदकामाचा सपाटा लावल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोर-जीसाठी ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. त्यावेळी काही कंपन्यांनी केवळ खड्डे खोदले, त्यामध्ये केबल टाकलेच नाही, अशी मखलाशी जोडली जात आहे. या प्रकारामुळे कंपन्यांसह प्रशासन व सत्ताधारी भाजपची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाReliance Jioरिलायन्स जिओ