शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

अकोला मनपाला अर्थसंकल्पासाठी मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 12:36 PM

आर्थिक वर्ष मार्च महिना संपण्यास अवघा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आर्थिक वर्ष संपण्यास अवघा २० दिवसांचा अवधी शिल्लक असताना अद्यापपर्यंत महापालिक ा प्रशासनाला अर्थसंकल्प सादर करण्यास मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र समोर आले आहे. मनपातील मुख्य लेखापरीक्षकांचे पद रिक्त असून, या पदाचा अतिरिक्त प्रभार स्वीकारण्यास शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नकारघंटा कायम असल्यामुळे प्रशासनासोबतच सर्वाधिक कोंडी सत्तापक्ष भाजपाची झाल्याची माहिती आहे. हा गुंता प्रशासन व सत्तापक्ष कशा रीतीने सोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गत दोन वर्षांपासून महापालिकेची विस्कटलेली घडी अद्यापही रुळावर येत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय कारभार सुरळीत चालविण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी, शहर अभियंता बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची गरज आहे. वर्तमान स्थितीत मनपात मुख्य लेखापरीक्षक, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आदी पदांसह करमूल्यांकन अधिकाºयांचे पद रिक्त आहे.साहजिकच याचा परिणाम प्रशासकीय कारभारावर झाला आहे. २०२०-२१ मधील आर्थिक वर्ष मार्च महिना संपण्यास अवघा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे; परंतु अद्यापपर्यंतही लेखा विभागाकडून अर्थसंकल्पाची तयारी पूर्ण झाली नसल्याची माहिती आहे.प्रशासनाने तयार केलेल्या अर्थसंकल्पात सर्वात प्रथम स्थायी समितीमध्ये दुरुस्त्या सुचविणे क्रमप्राप्त आहे. स्थायी समितीने सुचविलेल्या बदलांचा समावेश करीत सुधारित अर्थसंकल्प महासभेक डे सादर केला जातो. अद्यापपर्यंत प्रशासनाच्या स्तरावर अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्याने अर्थसंकल्पीय सभेसाठी प्रशासनाला नेमका कधी मुहूर्त सापडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘स्थायी’कडून ५३६ कोटींचे अंदाजपत्रकगतवर्षी महापालिक ा आयुक्त संजय कापडणीस यांनी अवाजवी खर्च व तरतुदींना फाटा देत २०१९-२० या चालू आर्थिक वर्षासाठी २२८.५२ कोटींचे उत्पन्न आणि २२८.०३ कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. जमा व खर्चाच्या एकूण ५३६.४३ कोटींच्या अंदाजपत्रकात स्थायी समिती सदस्यांनी दुरुस्त्या सुचविल्या होत्या.

पदाधिकाºयांशी बिनसले तेव्हापासून...मनपाचे प्रभारी मुख्य लेखापरीक्षक जे. एस. मानमोठे यांची जिल्हा परिषदेतून बदली झाल्यामुळे मनपाच्या लेखा विभागाचा कारभार ठप्प झाला आहे. तत्पूर्वी पीडीकेव्हीतील एका वरिष्ठ महिला अधिकाºयाकडे मुख्य लेखापरीक्षकाचा प्रभार सोपविण्यात आला होता; परंतु काही पदाधिकाºयांनी केलेल्या अवाजवी सूचनांचे महिला अधिकाºयाने पालन केले नाही अन् तेव्हापासून या पदावर येण्यास कोणताही वरिष्ठ अधिकारी इच्छुक नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका