शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:32 IST

खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात सलग चौथा विजय मिळवून खासदार अ‍ॅड.संजय धोत्रे यांनी मतदार संघाच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित करून त्यामध्ये आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. खा.धोत्रे यांच्यातील नेतृत्वगुण हेरत भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. खा.धोत्रे यांच्या रूपात अकोला जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा मान मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेत अमरावती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी, जनरल सेक्रेटरी म्हणून सुरुवात करणारे खासदार संजय धोत्रे यांचा राजकीय प्रवास वाखाण्यासारखा आहे. आपले मत परखड व सत्यता मांडण्याची त्यांची शैली सर्वांना भावणारी आहे. आपल्या जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांनी शेतकºयांच्या मागण्यांसाठी, अन्यायाविरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला. शेतकºयांच्या न्याय-हक्कासाठी त्यांनी शेतकरी चळवळीत हिरिरीने सहभाग नव्हे, तर लढा दिला. त्यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीने ते राष्ट्रीय राजकारणात पोहोचले. त्यांचे नियोजन आणि अथक परिश्रम, विकास कामांमुळे ते राष्टÑीय राजकारणात समरस झाले. १९५९ मध्ये अकोला जिल्ह्याातील पळसो बढे या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या संजय श्यामराव धोत्रे यांनी अभियांत्रिकीमध्ये मेकॅनिकल पदवी प्राप्त केली. आपल्या कुटुंबाचा पारंपरिक शेती व्यवसाय बघताना माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी उत्पादन निर्मिती, अ‍ॅग्रो फुड प्रोसेसिंग व्यवसायतही ते उतरले. हा व्यवसाय करताना कोणत्याही गोष्टीचा मुळापासून अभ्यास करण्याची सवय त्यांना लागली. हीच सवय पुढे त्यांना राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी उपयोगी पडलेली असावी. धोत्रे यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचा योग्य प्रकारे वापर करीत त्यांनी शेतकºयांना योग्य सल्ला प्राप्त व्हावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात केली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जिल्'ात भाजपाचा विस्तार झाला. एकापाठोपाठ जिल्'ात भाजपाचे आमदार, महापालिकासारख्या निवडणुकीत मोठा विजय झाला. व्यवसायातील प्रचंड मेहनतीमुळे त्यांना १९८७ मध्ये महाराष्टÑ शासनाचा उद्योजकता पुरस्कार मिळाला. कृषी क्षेत्रात अतुलनीय कामाबद्दल १९९९ मध्ये त्यांना स्व. वसंतराव नाईक मेमोरियल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच त्यांना १९९९ मध्ये मूर्तिजापूर विधानसभामध्ये त्यांनी भाजपाचे आमदार म्हणून पहिला विजय प्राप्त केला.

शेतकरी आंदोलन

विद्यार्थी चळवळीत सहभागी होत असताना, शेतकºयांसाठीच्या लढ्यात त्यांनी सहभाग घेत आंदोलन केले. विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांचा पुढाकार असे. त्यांच्यातील ही चुनूक बघून प्रथमच त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले व ते निवडूनदेखील आले. त्यांच्या कामाची हातोटी बघता २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रथम उमेदवारी मिळाली. वि

विध शासकीय खात्याचे सदस्य

धोत्रे यांनी जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रत्येक गावात त्यांनी कार्यकर्ता जोडण्यासाठी काम केले. याच त्यांच्या राजकीय परिपक्वक्षमतेमुळे त्यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी सल्लागार समितीचे सदस्य, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीपदी वर्णी लागली. २०१८ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्टÑ कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. तत्पूर्वी ते महाराष्टÑ राज्य रोजगार निवड मंडळाचे सदस्य होते. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण समितीवर असताना त्यांनी वन्यजीवाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. २००४ पासून ते अकोला येथे रेल्वेच्या अंदाजपत्रक समितीवर कार्यरत आहेत. एमसीएईआरचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचे काम अतुलनीय आहे.

यशस्वी नेतृत्व

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की विधानसभा निवडणूक, त्यांचे परफेक्ट नियोजन विजय प्राप्त करू न देणारे ठरले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षश्रेष्ठीपुढे केलेल्या उमेदवारांची शिफारस व मतदारसंघात केलेले नियोजन लक्षवेधी ठरले. जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा सफाया झाला. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झाले.

राजकिय प्रवास

संजय धोत्रे भाजप, खासदार, अक ोला (वय : ६०) शिक्षण : पदवीधर (अभियांत्रिकी) परखड व सत्य बोलणे, पक्ष विस्तारासाठी अग्रगण्य, कुशल संघटक पत्नी सुहासिनी, मुलगा अनुप व नकुल भाजपा नेते शेतकरी, उद्योजक विद्यार्थी, शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग संचालक- महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळ 26 फेब्रुवारी 1959 जन्म 1997

भाजपमध्ये प्रवेश

बालपणापासूनच वेगळे व्यक्तिमत्त्व असलेले संजय धोत्रे १९९७-९८ च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रथम आमदार आणि आता सलग चौथ्यांदा ते खासदार झाले.

२004

रेल्वे अंदाजपत्रक समितीवर कार्यरत

2009 लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे विविध समित्यांची जबाबदारी आली. तत्पूर्वी ते संचालक ग्रामविकास सहकारी जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी, डॉ. पंदेकृविच्या बोर्ड आॅफ स्टडीज व इतर संस्थेवर सदस्य होते.

2014

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथम खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी शेतकºयांचे प्रश्न मांडले. अकोला जिल्हा नव्हे, तर पश्चिम वºहाडाच्या विकासासाठी त्यांनी आवाज उठविला. खारपाणपट्टा या भागातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराने पोखरासारखे प्रकल्प या भागात आले. हीच त्यांची कामाची शैली या भागात भाजपला घराघरांत पोहोचविणारी ठरली.

2019

लोकसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम. प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेऊन दमदार विजय मिळवला. या निवडणुकीत खा.धोत्रे यांनी ५ लाख ५४ हजार ४४४ मते घेऊन नवा विक्रम नोंदविला.

टॅग्स :Sanjay Dhotreसंजय धोत्रेakola-pcअकोलाBJPभाजपा