शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:30 IST

अकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणार्‍या युवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक वाशिम येथील असून, तो अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला आहे. चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव आहे. 

ठळक मुद्देयुवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणार्‍या युवकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक वाशिम येथील असून, तो अकोल्यात शिक्षण घेण्यासाठी आला आहे. चेतन किशोर लहाने असे आरोपीचे नाव आहे. चेतन हा अकोल्यात पॉलिटेक्निकचे शिक्षण घेण्यासाठी आला आहे. तो जवाहर नगरमध्ये भाड्याने खोली करून राहत होता. यावेळी त्याची ओळख गीता नगरमध्ये राहणार्‍या इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका मुलीसोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने  ऑक्टोबर २0१६ पासून त्याच्या खोलीवरच त्या मुलीवर सतत बलात्कार केला. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. मुलीची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला वेदना झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला. कुमारीमाता असल्याने या घटनेची नोंद सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केल्यानंतर जुने शहर पोलिसांकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. मुलीचे बयाण घेतल्यानंतर या मुलीवर वाशिम येथील युवकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार केल्याचे समोर आले. त्यामुळे सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात वाशिम येथील युवकाविरुद्ध बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक शोषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल लाइन्स पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाRapeबलात्कार