शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पाणीपुरवठ्यामुळे अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:16 IST

अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने  शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे.

ठळक मुद्देविधिमंडळ विशेष कुंभारी तलावाचा ताबा आणि स्वतंत्र्य पाणी पुरवठा पाइपलाइनची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने  शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे. कुंभारी तलावाचा ताबा आणि महान धरणापासून स्वतंत्र पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव अकोल्यातून पाठविले जात आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रक ल्पांना मंजुरी मिळते काय, याकडे अकोल्यातील उद्योजकांचे लक्ष लागून आहे.  नागपूरनंतर अकोला एमआयडीसीचा उद्योग विदर्भात सर्वात मोठा आहे. डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगरच्या अकोल्यातील उद्योजकांनी आपली वेगळी छाप उमटविली आहे. विदर्भात क्रमांक दोनचा उद्योग अकोल्यात असतानाही एमआयडीसीचे विभागीय कार्यालय येथे नाही. पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना येथे नाही. दर दोन वर्षांनंतर पाणी समस्येमुळे अकोला एमआयडीसीतील पाणी टंचाईमुळे येथील उद्योजकांची गैरसोय होते. यंदाही पाणी समस्येमुळे अकोल्यातील शेकडो उद्योग अडचणीत सापडले आहेत. उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन सक्षम नाही. खांबोराहून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यापासून कुंभारी धरणातून उद्योगांना पाणी दिले जात आहे. तीन दिवसाआड केवळ एक तास पाणी दिले जात आहे. डिसेंबरनंतर बोअर करणे आणि विहीर अधिग्रहणाचे प्रयोग सुरू होणार आहेत.कधीकाळी मलकापूर ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेला कुंभारीचा तलाव आता एमआयडीसीने ताब्यात घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. तसेच मजीप्राने स्वतंत्र पाइपलाइन बसविण्यासाठी १९ कोटींचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या  दोन्ही प्रस्तावांवर गंभीरतेने विचार झाला, तर अकोल्यातील उद्योगांना संजीवनी देऊन जगविण्याचे बळ मिळेल, अशी अपेक्षा अकोल्यातील शेकडो उद्योजकांना लागली आहे.

एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या गत अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. अकोल्यातील उद्योजक गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याचे अनेक उपाय सूचवित आहेत. मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही. यंदाही नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्याची दखल अधिकारी किती घेतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळWaterपाणी