शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

By atul.jaiswal | Updated: June 29, 2024 18:56 IST

Akola News: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होत असलेला बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ॲसीस टु जस्टीस प्रकल्प यांना यश आले.

- अतुल जयस्वाल अकोला - बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात होत असलेला बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ॲसीस टु जस्टीस प्रकल्प यांना यश आले.

गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, संरक्षण अधिकारी सुनिल सरकटे व ॲसीस टु जस्टीस प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे व सपना गजभिये यांनी प्रथम बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीसांना सोबत घेत विवाहस्थळी सदरच्या चमुने भेट दिली असता विवाहाची पुर्ण तयारी झाल्याचे साधरणत: २०० च्या आसपास वऱ्हाडी मंडळी एकत्र जमल्या निदर्शनास आले. अशा परीस्थीती चमुने वर आणी वधुच्या आई-वडील व नातेवाईक यांना बालविवाह कायद्याची माहीती दिली. मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न करता येत नाही असे सांगितले व मुलीला बाल कल्याण समिती अकोला यांचे समक्ष सादर करण्याबाबत सुचीत करण्यात आले. बालकल्याण समितीने मुली चे वय १८ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मुलींचे लग्न न करण्याबाबतचे हमी पत्र आई-वडीलांकडून लिहून घेतले.

गावामध्ये कोठेही बालविवाह होणर असल्यास त्याची माहीती ग्रामसेवक, पोलीस पाटील, पोलीस विभाग तसेच महिला व बालविकास विभागांतर्गत असणारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन ॲसीस टु जस्टीस चमू यांना द्यावी. तसेच १०९८, ११२ किंवा १०० या टाेल फ्रि क्रमांकावरही माहीती देता येते.- गिरीश पुसदकर (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अकोला)

टॅग्स :Akolaअकोलाmarriageलग्न