अकोला : अकोला बाजार समितीला भेट देऊन राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गारपीटग्रस्त, नाफेडचे धनादेश विलंबाने मिळत असल्याच्या तक्रार शेतकर्यांनी केल्या.या आढावा बैठकीला बाजार समितीचे प्रशासक एस.डब्ल्यू. डोंगरे, सचिव सुनील मालोकार, विशेष कार्यकारी अधिकारी शं.ना. बेंडे यांच्यासह समितीच्या इतर अधिकार्यांची उपस्थिती होती. डॉ. माने यांनी यावेळी अनेक सूचना या अधिकार्यांना दिल्या.बाजार समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या आत्महत्या व अपघातग्रस्त शेतकर्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत उपक्रमाची त्यांनी प्रशंसा करतानाच या बाजार समितीमध्ये संप होत नाहीत, याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पणन संचालकांनी इतर प्रतिनिधींशी चर्चा केली. व्यापारी प्रतिनिधी ओम गोयनका यांनी बाजार समिती व खासगी बाजारातील स्पर्धा बघता व्यापारी पुरक तरतुदी कराव्यात, अशी मागणी केली.अडते प्रतिनिधी रावसाहेब राहणे यांनी नि:स्पृह अडते हटवू नयेत, असा आग्रह धरला. शेतकरी प्रतिनिधी प्रकाश काळे व राजेंद्र भुईभार यांनी नाफेड खरेदीतील पेमेंट विलंबाबाबत नाराजी व्यक्त करू न शासनाने दखल घेण्याची मागणी केली.शेतकरी नीळकंठ तायडे यांनी गारपीटग्रस्ताचा मुद्दा मांडला. डॉ. माने यांनी सर्व प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
राज्य पणन संचालकाने घेतला अकोला बाजार समितीचा आढावा
By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST