शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

खोलेश्वरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:33 IST

गणेश रामचंद्र काळे(५६) हा व्यक्ती शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतावस्थेत पडून असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.

अकोला: शहरातील खोलेश्वरमधील लोहिया जिनजवळील एका अपार्टमेंटसमोर एक ५६ वर्षीय व्यक्ती शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. जखमी अवस्थेत दिसून आल्याने, या व्यक्तीची हत्या करण्यात आली की आकस्मिक मृत्यू झाला, याबाबत संभ्रम आहे; परंतु कोतवाली पोलीस हत्येच्या दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास करीत आहेत.लोहिया जिनजवळ राहणारा गणेश रामचंद्र काळे(५६) हा व्यक्ती शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतावस्थेत पडून असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. गणेश काळे यांचे दोन्ही गुडघे फुटलेले दिसून आले, तसेच त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून त्याची हत्या तर केली नाही, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गणेश काळे याला दारूचे व्यसन होते. त्याला मुले व पत्नी आहे. त्यामुळे पडून तो जखमी झाला असावा आणि त्यातच मृत्यू झाला असावा, असाही कयास पोलीस व्यक्त करीत आहेत. कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोन्ही बाजुंनी पोलीस तपास करीत आहेत. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचा मृत्यू कशाने झाला आहे, हे समोर येईल. सध्यातरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी