शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  सहाही विधानसभा क्षेत्रात धोत्रेंना आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 13:01 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार संजय धोत्रे यांना मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा क्षेत्रात चांगलेच मताधिक्य मिळाले आहे.

ठळक मुद्देविधानसभेचे सहापैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत.बाळापूर भारिप-बमसं, रिसोड काँग्रेसच्या ताब्यात आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार संजय धोत्रे यांना मतदारसंघात समाविष्ट सहाही विधानसभा क्षेत्रात चांगलेच मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे, अकोला पूर्व मतदारसंघात ते विक्रमी आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. या मतदारसंघात अकोला शहराचा भागही असल्याने त्याचा चांगलाच फायदा झाला आहे.मतमोजणीतून संजय धोत्रे यांना गतवेळीपेक्षाही अधिक मताधिक्याने विजय मिळाला आहे. त्यासाठी भाजपने बुथ पातळीवर केलेली पक्षाची बांधणी चांगलीच कामी आली. विधानसभेचे सहापैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत, तर बाळापूर भारिप-बमसं, रिसोड काँग्रेसच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातही भाजपला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळेच धोत्रे यांच्या एकूण मताधिक्यात कमालीची वाढ झाली. विशेष म्हणजे, रिसोड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला हवी तेवढी मते मिळालेली नाहीत. त्याशिवाय, काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा तालुका असलेल्या अकोट मतदारसंघातही त्यांना फारसे मतदान झालेले नाही. परिणामी, २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले पटेल या निवडणुकीत तिसºया क्रमांकावर फेकले गेले आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना काही मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने त्यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत.लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत धोत्रे यांना ४ लाख ५५ हजार ९९६ मते मिळाली होती. त्यामध्ये यावेळी एक लाखापेक्षाही अधिक वाढ झाली आहे, तर आंबेडकर यांना ४० हजारांपेक्षाही मते वाढली आहेत. हिदायत पटेल यांनी गत निवडणुकीतील मतसंख्या कायम राखली आहे. पाच विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा प्रतिनिधी नसतानाही उमेदवाराला बºयापैकी मते मिळाल्याने परंपरागत मतदार कायम असल्याचे चित्रही यानिमित्ताने पुढे आले आहे.- उर्वरित विधानसभा क्षेत्रावर प्रभावविशेष म्हणजे, भाजपच्या ताब्यात अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर व अकोट मतदारसंघ आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर आणि रिसोड मतदारसंघातही भाजपचा उमेदवार विजयी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र त्यावेळी रिंगणातील उमेदवार, परिस्थिती, मुद्यांच्या विषयावर चित्रात फरक पडू शकतो.

‘की फॅक्टर’ काय ठरला...१ - गत लोकसभेनंतर विधानसभेतही चांगलेच यश मिळाल्याने ते कायम ठेवण्यात भाजप यशस्वी ठरले.२ - केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांची प्रचार, प्रसिद्धीचाही बराच लाभ मिळाला.३ - खासदारकीच्या कार्यकाळात कोणत्याही वादात न पडल्याने त्याचा फायदा धोत्रेंना झाला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालakola-pcअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा