शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-खंडवा ब्रॉडगेज मार्ग राजकीय ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 10:28 IST

सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत थांबायला तयार नाही. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाला पर्याय शोधावा, असे समोर आल्यावर हा मार्ग बुलडाण्यातून नेण्यासाठी राजकीय आंदोलन उभे राहिले दुसरीकडे या मार्गावरील अकोटपर्यंतचा टप्पा पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी मार्गाची पाठराखण केल्याने हा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणप्रेमींचा या मार्गाला विरोध होत आहे. मेळघाटमधून जाणारा प्रस्तावित मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम असून, त्याऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याचा रेटा राज्य शासनाकडे सुरू असून, न्यायालयातही याचिका दाखल आहेत. याच सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती समितीकडे सध्या प्रकरण सोपविलेले आहे. या पृष्ठभूमीवर १५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र लिहून अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर पर्यावरणवाद्यांसह बुलडाणा जिल्हा वासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या मागणीचा मिळेल त्या व्यासपीठावरून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर दुसरीकडे तेल्हारा तालुक्यातूनही हा रेल्वेमार्ग अकोला, हिवरखेड, तेल्हारा येथून पुढे संग्रामपूर, जळगाव जामोद येथून खंडवा येथे नेण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. तिकडे मेळघाटातही या मुद्यावर राजकारण तापले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता ही रेल्वे महत्त्वाची असून, हा मार्ग पूर्ववत ठेवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. या मागणीसाठी भाजपाने पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्यदिनी मेळघाटातील गावांमध्ये ग्रामपंचयातीने या मार्गासाठी ठराव केले आहेत.

भाजपाविरुद्धशिवसेना असा रंग येणार!अकोला ते खंडवा हा बहुप्रतीक्षित मार्ग पूर्ण व्हावा यासाठी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. या मार्गावर धावलेल्या अखेरच्या रेल्वेमध्ये प्रवास करून त्यांनी त्यांच्यासाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले होते. सध्या पर्यावरणाच्या मुद्यावर एकीकडे न्यायालयात याचिका दाखल असताना राजकीय वातावरणही तापले आहे. या पृष्ठभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाने आहे तोच मार्ग ही भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे, तर बुलडाण्यात सेनेचे खासदार असल्याने ते पर्याय मार्गाचे समर्थक आहेत, त्यामुळे या मुद्दाला भाजपा विरुद्ध शिवसेना असा रंग येण्याची चिन्हे आहेत.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणAkolaअकोलाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा