शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : जिल्हय़ातील विकास कामे, वसतिगृहे, निवासी शाळांची समितीद्वारे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:15 IST

अकोला : जिल्हय़ातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये झालेली विकास कामे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये भेट देत विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने गुरुवारी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीची माहिती घेतली. यावेळी आढळलेल्या त्रुटीसंदर्भात उद्या शुक्रवारी संबंधित अधिकार्‍यांची साक्ष घेतली जाणार आहे. 

ठळक मुद्देअनुसूचित जाती कल्याण समिती: आज घेणार अधिकार्‍यांची साक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये झालेली विकास कामे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये भेट देत विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने गुरुवारी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीची माहिती घेतली. यावेळी आढळलेल्या त्रुटीसंदर्भात उद्या शुक्रवारी संबंधित अधिकार्‍यांची साक्ष घेतली जाणार आहे.  समितीचे प्रमुख आमदार हरीश पिंपळे, समितीचे सदस्य आमदार सर्वश्री लखन मलिक, ज्ञानराज चौगुले, गौतम चाबुकस्वार, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे आदींसह  समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने उपस्थित होते. समितीच्या ठरलेल्या दौर्‍यानुसार जिल्हय़ातील मागासवर्गीय शासकीय अनुदानित शाळा, वसतिगृहे, शासन तसेच जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या कामांना भेट देण्यात आली. त्यामध्ये अकोला पंचायत समितीमधील ग्रामपंचायत पैलपाडा, ग्रामपंचायत बोरगाव मंजू येथील दलित वस्ती, विशेष घटक योजनेतून झालेल्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथील समाजकल्याण विभागाची अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळतो की नाही, याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती घेण्यात आली. त्यानंतर मूर्तिजापुरातील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात भेट देण्यात आली. तेथील भोजन कक्ष, भांडार कक्ष व ग्रंथालय तसेच पिण्याची पाण्याच्या व्यवस्थेची समिती सदस्यांनी पाहणी केली. पाहणीमध्ये आढळलेल्या त्रुटींसंदर्भात उद्या शुक्रवारी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. 

अनेक विभागांचा आज समितीकडून आढावाशुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये गुरुवारी पाहणी केलेल्या अनुदानित शाळा, वसतिगृहे, विकास कामांतील त्रुटीसंदर्भात विचारणा केली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महानगरपालिका, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) या कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा होणार आहे.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणSchoolशाळा