शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : घरकुल लाभार्थी निवड प्रक्रियेत तीन महिने आधीच मय्यत दाखवून केले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:02 IST

अकोला : तालुक्यातील सांगळूद गावातील विठ्ठल शिवाजी मंडासे हयात असताना त्यांचे नाव पात्र यादीतून मय्यत म्हणून कमी करण्यात आले, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड सभेनंतर तीन महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे, जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून त्याला अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखा आहे. 

ठळक मुद्देसांगळूद येथील घरकुल लाभार्थी निवड सभेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तालुक्यातील सांगळूद येथे रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी निवड प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्याचे प्रकार पुढे येत आहेत. गावातील विठ्ठल शिवाजी मंडासे हयात असताना त्यांचे नाव पात्र यादीतून मय्यत म्हणून कमी करण्यात आले, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड सभेनंतर तीन महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे, जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून त्याला अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखा आहे. सांगळूद ग्रामपंचायतीमध्ये घरकुल लाभार्थी निवड यादीत मोठय़ा प्रमाणात अपात्र लाभार्थी घुसडण्यासाठी पात्र लाभार्थींना वगळण्यात आले आहे. त्यातून गरजवंत कुटुंबाला घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले. हा प्रकार एकाच कुंटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ दिल्यानंतर उघड होत आहे. ७ फेब्रुवारी २0१७ रोजी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र-अपात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाली. त्या अपात्र यादीमध्ये विठ्ठल शिवाजी मंडासे यांचे नाव १८४ क्रमांकावर नमूद होते. त्यापुढे मय्यत असा शेरा लिहिण्यात आला. विशेष म्हणजे, लाभार्थी निवडीची सभा १५ ऑगस्ट २0१६ रोजी झाली होती. त्यावेळी निवड झाल्यानंतर पात्र-अपात्र निवड करण्यात आली. ती यादी तयार झाल्यानंतर २६ नोव्हेंबर २0१६ रोजी मंडासे यांचे निधन झाले. निवड सभेच्या तारखेनंतर तीन महिन्यापर्यंत ते जिवंत होते. सभेत निवड करतानाच त्यांच्या नावापुढे मय्यत शेरा कसा लिहिण्यात आला. त्यामुळे अपात्र कसे ठरवले, याची तक्रार कलावंताबाई मंडासे यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. सोबतच कच्चे घर असलेल्यांमध्ये रुख्माबाई घावट, रमेश जाधव यांचे पक्के घर असल्याचे दाखवून अपात्र करण्यात आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच राहणारे बी.के. कुकडकर बाहेरगावी असल्याचे दाखवून त्यांनाही अपात्र करण्यात आले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाभार्थींना अपात्र ठरवून त्यांच्याऐवजी इतर अपात्र असलेल्यांना लाभ दिल्याच्या तक्रारी गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आल्या. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता ग्रामसेवक, सरपंचावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणzpजिल्हा परिषद