शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : डाबकी रोडवरील हायप्रोफाइल कुंटणखान्यावर छापा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:09 IST

अकोला : बाळापूर रोडवरील पार्वती नगरमध्ये एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून श्रीवास मायलेकासह युवतीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देया ठिकाणावरून श्रीवास मायलेकासह युवतीला ताब्यात घेण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर रोडवरील पार्वती नगरमध्ये एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्यावर शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून श्रीवास मायलेकासह युवतीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वती नगरात कस्तुरी गोपाल श्रीवास व गणेश गोपाल श्रीवास यांच्या घरात हायप्रोफाइल कुंटणखाना चालविण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील व डाबकी रोडचे ठाणेदार सुनील सोळंके यांना मिळाली. त्यांनी गत काही दिवसांपासून या घरावर पाळत ठेवली. त्यानंतर सदर घरात युवतींना ने-आण करण्यात येत असल्याची खात्री पटताच मंगळवारी सायंकाळी कस्तुरी श्रीवास हिच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. या घरातून ग्राहक फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र, एका पीडित युवतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडले असून, हा गोरखधंदा चालविणार्‍या कस्तुरी गोपाल श्रीवास व तिचा मुलगा गणेश गोपाल श्रीवास या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, डाबकी रोडचे ठाणेदार सुनील सोळंके, जुने शहरचे ठाणेदार गजानन पडघन, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईनंतर एम एच १२ पुणे पासिंगची एक कार पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. या देहविक्री अड्डय़ावर अनेक बड्या व्यक्तींची ये-जा असल्याचेही समोर आले असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

तीन कुंटणखाने उघडगत एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत अकोला पोलिसांनी शहरातील तीन ठिकाणचेकुंटणखाने उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये रिंग रोडवरील समता कॉलनीतील, त्यानंतर जठारपेठेतील ज्योती नगर व आता बाळापूर रोडवरील श्रीवास यांच्या घरातील या  कुंटणखान्यावर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले. यावरून अकोला पोलिसांनी गत काही दिवसांत मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी मोठी कारवाई केल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशाने या कारवाया करण्यात येत आहेत. पोलीस अधीक्षकांनी अशा अड्डय़ांवर छापेमारी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी गंभीर पावले उचलल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाArrestअटक