शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पत्नीचा शारीरिक छळ करणारा शिक्षक पती कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:40 IST

अकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली.

ठळक मुद्देन्यायालयाने विकृती शिक्षकाची केली कारागृहात रवानगी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीस न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने विकृती शिक्षकाची कारागृहात रवानगी केली.पीडित पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, गोरक्षण रोडवरील एका शाळेतील शिक्षकाचे तिच्यासोबत २३ मे २0११ रोजी लग्न झाले. लग्नानंतर एका महिन्याने पतीने तिचा छळ सुरू केला. पतीच्या वागण्यात सुधारणा होईल, या आशेने तिने माहेरकडील लोकांना छळाविषयी सांगितले             नाही. तिचा छळ सुरू असल्याने, ती अधूनमधून माहेरी पातूरला जात होती; परंतु पती हा नातेवाइकांच्या माध्यमातून पत्नीची समजूत घालून तिला घरी परत आणायचा. पती हा विकृत मानसिकतेचा असल्याने, पत्नीवर तो सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यासोबतच तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारसुद्धा करायचा. त्याच्या छळाला व अनैसर्गिक अत्याचाराला कंटाळून पत्नी माहेरी निघून आली. त्यानंतर पतीने तिला धमकावले. अखेर पत्नीने तिच्या आई-वडिलांना पती बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले. पीडितेने तिच्या आई-वडिलांसोबत गुरुवारी दुपारी खदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी पती आणि हुंड्यासाठी छळ करणारा सासरा, सासू, दोन नणंद आणि त्यांचे पती आदींविरुद्ध भादंवि कलम ३७७, ४९८ (अ) (३४) नुसार गुन्हा दाखल केला. पतीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. रविवारी त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशनCrimeगुन्हाArrestअटक