शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मतदारदिनी जिल्हय़ातील दिव्यांग मतदारांचा होणार सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:05 IST

अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २५ जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा स्तर, विधानसभा मतदारसंघ स्तरावर आणि मतदान केंद्र स्तरावर मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकार्‍यांमार्फत मतदार दिन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी मतदार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्रांचे वाटप तसेच रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहेत, तसेच निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांना भाग घेणे सुलभ व्हावे, यासाठी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांमार्फत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या संदेशाचे होणार वाचन!मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित मतदार दिन कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या संदेशाचे वाचन करण्यात येणार आहे, तसेच चित्रफीतही दाखविण्यात येणार आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर