शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

अकोला ‘जीएमसी’च्या सहयोगी प्राध्यापकाची  आंतरराष्ट्रीय ‘फायमर फेलोशिप’साठी निवड

By atul.jaiswal | Published: January 06, 2018 1:19 PM

अकोला :अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘फाउंडेशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन रिसर्च’ (फायमर) या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाºया ‘फेलोशिप’साठी यंदा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल बी. वारकर यांची निवड झाली आहे.

ठळक मुद्देअकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल बी. वारकर यांची निवड झाली आहे.वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या ‘फेलोशिप’साठी दरवर्षी संपूर्ण भारतातून केवळ १० जणांची निवड केली जाते.यावर्षी भारतातून निवडलेल्या १० जणांमध्ये अकोला ‘जीएमसी’चे डॉ. वारकर हे महाराष्ट्रातील एकमेव प्राध्यापक आहेत.

अकोला : गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘फाउंडेशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट आॅफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन रिसर्च’ (फायमर) या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या  ‘फेलोशिप’साठी यंदा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल बी. वारकर यांची निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या ‘फेलोशिप’साठी दरवर्षी संपूर्ण भारतातून केवळ १० जणांची निवड केली जाते. यावर्षी भारतातून निवडलेल्या १० जणांमध्ये अकोला ‘जीएमसी’चे डॉ. वारकर हे महाराष्ट्रातील एकमेव प्राध्यापक आहेत.अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील ‘फायमर’ संस्था ही वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या  वैद्यकीय शिक्षकांना फेलोशिप प्रदान करीत असते. या फेलोशिपसाठी दरवर्षी दक्षिण-पूर्व आशियातून १६ वैद्यकीय प्राध्यापकांची निवड केली जाते. यामध्ये १० भारतातील, तर उर्वरित सहा जण हे दक्षिण-पूर्व आशियातील इतर देशांमधून निवडले जातात. वर्ष २०१८ साठी भारतातून निवडल्या गेलेल्या १० वैद्यकीय प्राध्यापकांमध्ये अकोला ‘जीएमसी’मध्ये शरीरक्रियाशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. अनिल वारकर यांचा समावेश आहे. या फेलाशिपसाठी निवड झालेले डॉ. अनिल वारकर हे महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून एकमेव ठरले आहेत. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाची निवड या फेलोशिपसाठी व्हावी, याकरिता अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते हे गत तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेर यावर्षी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. डॉ. वारकर यांची निवड झाल्याबद्दल डॉ. राजेश कार्यकर्ते, उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला.काय आहे फेलोशिप?‘फायमर’ ही संस्था दरवर्षी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना फेलोशिप देत असते. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकविणारे प्राध्यापक हे त्यांच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे आणि नवीन पद्धतीने कसे शिकवू शकतात, यासाठी फायमर फेलोशिप अंतर्गत तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. दक्षिण-पूर्व आशियासाठी लुधियाना येथील ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय हे प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१८ आणि ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ अशी दोन वेळा प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. या दरम्यानच्या काळात निवड झालेल्या प्राध्यापकांना आॅनलाइन प्रशिक्षण दिले जाते.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय