शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

थॅलेसीमिया रुग्णांसाठी ‘जीएमसी’त औषधेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:30 IST

अकोला : थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त बहुतांश रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून आहेत; परंतु या ठिकाणी थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी औषधच उपलब्ध नाहीत.

- प्रवीण खेतेअकोला : थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त बहुतांश रुग्ण उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून आहेत; परंतु या ठिकाणी थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी औषधच उपलब्ध नाहीत. दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केंद्राच्या योजनेंतर्गत इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला; मात्र तो पर्याप्त नसल्याने रुग्णांची चांगलीच पंचाईत झाली आहे.थॅलेसीमिया, सिकलसेल आणि हिमोकिलिया या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र शासनांतर्गत प्रत्येक विभागात एक ‘डे केअर सेंटर’ उपलब्ध करून दिले. या सेंटरच्या माध्यमातून संबंधित विभागातील रुग्णांना आवश्यक औषध पुरवठा केला जातो; परंतु विभागातील आरोग्य यंत्रणेपर्यंत या औषधी योग्य वेळत पोहोचतच नसल्याने थॅलेसीमियाच्या रुग्णांना योग्य वेळी औषध मिळत नाही. आजाराने त्रस्त असलेल्या या रुग्णांना योग्य वेळी औषध न मिळाल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते; परंतु त्यांना नियमित उपचार देण्यात जिल्हा स्तरावरील आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे.गोळ्या आहेत, तर इंजेक्शन नाहीराज्यातील काही शासकीय रुग्णालय वगळल्यास बहुतांश ठिकाणी थॅलेसीमियाचे औषधेच उपलब्ध नसल्याची माहिती आहे. विभागाचे ठिकाण सोडल्यास इतर जिल्ह्यात थॅलेसीमिया रुग्णांसाठी इंजेक्शनदेखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी विभागीय ‘डे केअर सेंटर’ला भेट द्यावी लागते.जिल्हा स्तरावर हवे ‘डे केअर सेंटर’केंद्र शासनाच्या अखत्यारीत प्रत्येक विभागात विभागीय स्थळी सुरू असलेल्या डे केअर सेंटरपर्यंत प्रत्येक रुग्ण पोहोचू शकत नाही. शिवाय, जिल्हा स्तरावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांमध्येही थॅलेसीमियाचे औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत या रुग्णांसाठी जिल्हा स्तरावर डे केअर युनिट असणे गरजेचे आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन नव्हते. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत अमरावती येथील डे केअर सेंटरमधून इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ रुग्णांना होईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयHealthआरोग्यAkolaअकोला