शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकाेल्याच्या तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या

By आशीष गावंडे | Updated: May 28, 2024 21:58 IST

मारेकरी युवकाचे पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण

अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील एका ३० वर्षीय युवतीची दिल्ली येथील गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात प्रियकराने चाकू भाेसकून व नंतर डाेक्यात सिलींडरने प्रहार करुन निर्घूण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवतीची हत्या केल्यानंतर मारेकरी प्रियकराने टिकरी परिसरातील सदर पाेलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करुन गुन्ह्याची कबुली दिली. हत्येची घटना १८ मे राेजीच्या रात्री आठ वाजता झाल्याची माहिती आहे. 

सारीका वानखडे (वय ३०, रा.लक्ष्मी नगर डाबकी राेड अकाेला)असे हत्या झालेल्या युवतीचे नाव असून सुरज वर्मा (वय २३,रा.वानखडे नगर डाबकी राेड अकाेला)असे हत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. डाबकी राेड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाेघांमध्ये मागील काही वर्षांपासून प्रेमसंबंध हाेते. परंतु मध्यंतरी त्यांचे बिनसल्यामुळे सारीकाने सुरज याच्या विराेधात पाेलिस तक्रार दाखल केली हाेती. नंतर या दाेघांत समेट झाल्यामुळे तीने पाेलिस तक्रार मागे घेतली हाेती.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सुरज हा खासगी नाेकरीनिमीत्त पुण्याला निघून गेला. पुढे तेथून त्याची बदली दिल्ली येथील गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात झाली. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी सारीकाने सुरजसाेबत संपर्क साधून दिल्ली गाठली. भेटीदरम्यान १८ मे राेजी रात्री त्यांच्यात झालेला वाद विकाेपाला गेला. रागाच्या भरात सुरजने तीच्या डाेक्यात व गळ्यावर धारदार चाकूने अनेक वार केले. तसेच डाेक्यावर सिलींडरने प्रहार केले. या हल्ल्यात सारीका जागीच गतप्राण झाली.

...म्हणून तीला मारलेसारीकाची हत्या केल्यानंतर सुरजने टिकरी परिसरातील सदर पाेलिस ठाणे गाठले. व युवतीची हत्या केल्याची कबुली पाेलिसांना दिली. सारीकाकडून सतत पैशांची मागणी केली जात हाेती. पैसे न दिल्यास ती पाेलिसात तक्रार करण्याची धमकी देत असल्यामुळे तीचा खून केल्याची कबुली मारेकरी युवकाने सदर पाेलिस स्टेशनमध्ये दिली. याप्रकरणी सदर पाेलिस स्टेशनमध्ये सुरज वर्मा याच्या विराेधात हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हत्येप्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात संपर्क साधला. आम्ही दिल्ली येथील संबंधित पाेलिस स्टेशनसाेबत संपर्क केला. त्यानंतर तरुणीचे कुटुंबिय दिल्लीकडे रवाना झाले.-सुरेंद्र बेलखेडे पाेलिस निरीक्षक, डाबकी रोड, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी