शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घनकचऱ्याचे ढीग; ४५ कोटींची निविदा रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:50 IST

पहिला हप्ता मिळाल्यानंतरही प्रशासनाने अद्यापपर्यंत निविदा प्रक्रिया राबवली नसल्याचे समोर आले आहे.

अकोला : घनकचºयाचे विलगीकरण करून त्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने महापालिकेचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर करीत जानेवारी २०१९ मध्ये शहरासाठी ४५ कोटी ३५ लक्ष रुपये निधी मंजूर केला. या प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या रकमेतून पहिला हप्ता मिळाल्यानंतरही प्रशासनाने अद्यापपर्यंत निविदा प्रक्रिया राबवली नसल्याचे समोर आले आहे. प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपच्या स्तरावर कचºयापासून वीज निर्मिती, सेंद्रिय खत निर्मितीच्या गप्पा केल्या जात असतानाच शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचºयामुळे अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडल्याची परिस्थिती आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात शासनाने मागील दोन वर्षांच्या कालावधीत सातत्याने पाठपुरावा करूनही कचºयाच्या विलगीकरणासाठी महापालिके च्या स्तरावर ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे ध्यानात घेता शासनाने प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी ‘मार्स’नामक एजन्सीची नियुक्ती केली. संबंधित एजन्सीने तयार केलेल्या डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नागपूर येथील निरी संस्थेमार्फत मूल्यांकन करण्यात आले. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला. त्यानंतर शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ४५ कोटी ३५ लक्ष मंजूर केले. शहरात दिवसेंदिवस घनकचºयाची समस्या बिकट होऊ लागली असून, अकोलेकरांना मोकळा श्वास घेता येत नसल्याची परिस्थिती आहे. शहराच्या कानाकोपºयात साचणाºया कचºयामुळे शहराचे पर्यावरण धोक्यात सापडले असून, हवा प्रदूषित झाली आहे. यावर प्रशासनाने निविदा बोलावून ही प्रक्रिया निकाली काढणे अपेक्षित होते. तसे होत नसल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंकाकुशंका निर्माण झाल्या आहेत.अनुभवी, मोठ्या कंपन्या अनभिज्ञ?मनपातील बांधकाम विभागाने घनकचरा व्यवस्थापनासाठी निविदा प्रकाशित केली असता केवळ एका एजन्सीने प्रतिसाद दिला. निकषानुसार मनपाने दुसºयांदा फेरनिविदा प्रकाशित करणे भाग होते. दुसºयांदा पुन्हा एकच निविदा आल्यास मनपाला तिसºयांदा निविदा बोलवावी लागेल. ४५ कोटींच्या कामासाठी अनुभवी मोठ्या कंपन्यांना जाणीवपूर्वक निविदा प्रक्रियेपासून लांब ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.खत निर्मिती वादाच्या भोवºयातनायगाव येथील डंम्पिंग ग्राउंडवर मागील तीन वर्षांपासून कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने एका स्वयंसेवी खासगी संस्थेची नियुक्ती केली. मागील तीन वर्षांच्या कालावधीत संबंधित संस्थेने आजवर किती टन कंपोस्ट खताची निर्मिती केली, हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे या ठिकाणी साठवणूक होणाºया कचºयाचे ढीग हटवण्यासाठी भाडेतत्त्वावर पोकलेन मशीन सुरू आहे. त्या बदल्यात लाखो रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी डम्पिंग ग्राउंडला उदरनिर्वाहाचे साधन बनविल्याचे चित्र आहे.

मागील तीन वर्षांपासून रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा मार्ग लवकरच मोकळा होईल. अनुभवी कंपन्यांनी निविदा सादर करावी, निकषानुसार निविदा मंजूर होईल.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका