शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : महापालिका करवाढीच्या विरोधात काँग्रेसची गांधीगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:12 IST

अकोला : महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी अकोलेकरांवर लादलेली करवाढ मागे घेण्याची मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी सत्तापक्षातील नगरसेवकांसह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुलाबाचे फूल भेट देऊन गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला. 

ठळक मुद्देमनपा आयुक्त, नगरसेवकांना दिले गुलाबाचे फूल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी अकोलेकरांवर लादलेली करवाढ मागे घेण्याची मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी सत्तापक्षातील नगरसेवकांसह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुलाबाचे फूल भेट देऊन गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला. मनपातील सत्ताधार्‍यांनी अकोलेकरांवर अतिरिक्त करवाढीचा बोजा लादला आहे. प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करताना घरातील शौचालयावर देखील कर आकारणी केली. मनपा प्रशासनाला नियमानुसार ४0 टक्क्यांपेक्षा अधिक कर आकारणी करता येत नाही. याठिकाणी मनपाने ६0 टक्के करवाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सभागृहात भाजपने करवाढीचा निर्णय घेताना खुद्द सत्तापक्षातील अनेक नगरसेवकांचा करवाढीला विरोध होता. नाईलाजाने नगरसेवकांनी भाजपचा निर्णय मान्य केला. भाजपमधील अशा नगरसेवकांनी पक्षाचे सर्मथन न करता अकोलेकरांचा विचार करण्याची मागणी करीत काँग्रेसने गांधीगिरीच्या माध्यमातून भाजपाचा निषेध व्यक्त केला. सोमवारी महापालिकेत उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्यासह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह मनपा आवारातील भाजप नगरसेवकांना काँग्रेस पदाधिकार्‍यांनी गुलाबाचे फूल देऊन करवाढ मागे घेण्याची विनंती केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा माजी महापौर मदन भरगड, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, नगरसेवक पराग कांबळे, सुषमा निचळ, इरफान खान, मोईन खान, फिरोज खान, राजू चितलांगे, गणेश कटारे, प्रदीप वखारिया, शरद गंगासागर, नौशाद अली, अभिषेक भरगड, मकसूद खान, अफरोज लोधी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcongressकाँग्रेस