शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : चार लाखांच्या ५८ किलो गांजासह दोघे गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:04 IST

अकोला : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चान्नी फाट्यावर छापा घालून ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा ५८ किलो १00 ग्रॅम गांजा जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी पोलीस कारवाई असल्याचा दावा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत केला. आरोपींनी पुरवठा करण्यासाठी परराज्यातून गांजा आणल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्दे‘एलसीबी’चे यश, परराज्यातून आणला गांजा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी चान्नी फाट्यावर छापा घालून ४ लाख ६ हजार रुपये किमतीचा ५८ किलो १00 ग्रॅम गांजा जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी पोलीस कारवाई असल्याचा दावा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत केला. आरोपींनी पुरवठा करण्यासाठी परराज्यातून गांजा आणल्याची माहिती आहे. दोन व्यक्ती एका व्यापार्‍याला परराज्यातून प्रतिबंधित गांजाचा (कॅनाबिज) पुरवठा करण्यासाठी चान्नी फाट्यावर येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह चान्नी फाट्याजवळ सापळा लावला. या ठिकाणी दोन व्यक्ती तीन पांढर्‍या प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा घेऊन असल्याचे दिसून आले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी दोघांना घेराव घालून शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील पिशव्यांची झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्यांची नावे श्याम रमेश काळपांडे (३२ रा. हिवरखेड), ओंकार अभिजित मोहिते (३0 रा. वारी हनुमान ता. तेल्हारा) असल्याचे सांगितले. ५८ किलो गांजा त्यांनी मध्य प्रदेशातून आणल्याचे सांगितले. दोघांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अशी माहितीही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय प्रकाश झोडगे, पीएसआय चंद्रकांत ममताबादे, एएसआय अशोक चाटी, जितेंद्र हरणे, अजय नागरे, शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहमद, संदीप तवाडे, मंगेश मदनकार व संजय पाटील यांनी केली. 

सिंधी कॅम्पमधून प्रतिबंधित गुटखा जप्तशहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली भागात दुकानावर छापा टाकू न ३२ हजार रुपये किमतीच्या प्रतिबंधित गुटख्याचे पाकिटे जप्त केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी केली. कच्ची खोलीत मोती गुलानी याच्या दुकानात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकानावर छापा घालून विविध प्रकारचे सुगंधित तंबाखूची पाकिटे, प्रतिबंधित गुटख्याची पाकिटे जप्त केली आणि मोती गुलानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा