शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

 माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 10:16 IST

Former BJP MLA Jagganath Dhone passes away माजी आमदार जग्गनाथ ढोणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.

ठळक मुद्देमृत्युसमयी ते६६ वर्षाचे होते.नूकतीच कोरोनावर मात केली होती.

लोकमत न्युज नेटवर्कपातुर : पातुरसारख्या आदिवासी दुर्गम भागातील लोकांसाठी पहिले आयुर्वेद महाविद्यालय उभारणारे माजी आमदार जग्गनाथ ढोणे यांचे मंगळवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते६६ वर्षाचे होते. दुपारी  12-30  वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद  महाविद्यालय परिसरातील डॉ .वंदनाताई ढोणे स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.२०आक्टोबर १९५४रोजी पातुर तालुक्यातील आलेगांव येथे‌ विश्वहिंदु परिषदेचे  बाबासाहेब ढोणे यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांना पाच भाऊ आणि दोन बहिणी आहेत.डॉ जग्गनाथ ढोणे विदर्भाचे पहिले गैस्ट्रोकोपी तज्ञ होते.पातुर तालुका अतिशय दुर्गम आणि मागासलेल्या भागातील नागरिकांसाठी प्रियदर्शनी आदिवासी ऊत्कर्ष फाऊंडेशन, नवेगाव च्या नावानं शिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रात पातुर बाळापूर रोडवर पातुर शहरालगत डॉ वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय स्थापन केले.त्याबरोबरच आडगाव,अकोट,तेल्हारा तळेगाव , अकोला सह मेळघाटातील डाबका,धुरळा आदी ठिकाणी शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या प्रामुख्याने ह्या सुविधा दुर्गम भागातील लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या हे विशेष!९०-९५या कालावधीमध्ये त्यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेत गेले,ते महाराष्ट्र आरोग्य सल्लागार समितीचे अध्यक्ष होतेओबिसीच्या प्रश्न मांडले. त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले.स्वतंत्र विदर्भ लढा लढला, जांबुवंतराव धोटे,अरुण अडसूळ, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम केलं. सध्या ते भारतीय जनता पक्षात कार्यरत होते.दिवंगत जगन्नाथ ढोणे यांना सतत कार्यरत राहण्याची आवड होती. सोमवारी पातुर तालुक्यातील मोर्णा धरणावर पर्यटन विकास करण्यासाठी दिवसभर कार्यरत होते. त्यांचे समवेत माजी आमदार गजानन दाळू गुरुजी आणि माजी आमदार तुकाराम बिरकड समवेत होते. कालचा दिवस कामात व्यस्त आणि त्यांनी आनंदात घातला.

कोरोनावर केली होती  मातअवघ्या सात दिवसांपुर्वी वाढदिवस साजरे करणारे डॉ जग्गनाथ ढोणे यांनी नूकतीच कोरोनावर मात केली होती मात्र सोमवारी सकाळी दोन-तीन वाजता लघूशंकेला जाण्यासाठी बाथरूम कडे जाताना जागेवरच कोसळले त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती सुत्रांनी दिली

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाPaturपातूर