शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अकोला : पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या सशस्त्र हल्लय़ात युवकाची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:27 IST

पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्‍या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १४ जणांना अटक केली. 

ठळक मुद्देशिवसेना वसाहतमधील घटना१४ जणांना अटक

लोकमत न्यूज नेवटर्कअकोला: पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्‍या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १४ जणांना अटक केली. शहरातील शिवसेना वसाहत राहणार्‍या तुषार नागलकर याच्या घरी बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत धुंद असलेले शैलेश अढाऊ, अश्‍विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान यांच्यासह आणखी काही युवक गेले. याठिकाणी त्यांनी तुषार नागलकर याला घराबाहेर बोलावून अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढत गेल्याने, नागलकर याच्या गटाने विरोधी गटावर सशस्त्र हल्ला चढविला. शैलेश अढाऊ याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्यावर तो जागीच रक्ताच्या थारोळय़ात कोसळला. हे पाहताच, या गटातील युवक पळायला लागले. परंतु नागलकर गटाने या युवकांवर जोरदार सशस्त्र हल्ला चढविला. यात अश्‍विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान हे गंभीर जखमी झाले. दुसर्‍या गटातील तुषार नागलकर हा सुद्धा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी भेट दिली. दोन्ही गटांनी परस्परांविरूद्ध दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नागलकर गटाविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला तर दुसर्‍या गटांतील युवकांविरूद्ध ३0७, ३२४, ५0४, १४३(३४) नुसार गुन दाखल केला. पोलिसांनी गुरूवारी दुपारपर्यंत १४ जणांना अटक केली आहे.  

या वादातून हल्लाशिवसेना वसाहतीजवळच अग्रवाल नामक इसमाचा प्लॉट आहे. या प्लॉटवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक अतिक्रमण करायचे. नंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी अग्रवालसोबत सेटलमेंट करायचे. नागलकर गटाने या प्लॉटवर काही लाकडी साहित्य ठेवलेले होते. याचा जाब विचारण्यासाठी शैलेश अढाऊ, अश्‍विन नवले आणि काही युवक तुषार नागलकरच्या घरी गेले होते. याठिकाणी त्यांनी नागलकरला अश्लील शिवीगाळ केली आणि त्याच्या घरातील दरवाजावर लाथा सुद्धा मारल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यातूनच नागलकर गटातून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. 

दोन्ही गटातील आरोपींना अटक राहुल खडसान याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सचिन नागलकर, अक्षय नागलकर, तुषार नागलकर, शुभम नागलकर, अमर भगत यांच्यासह आणखी तीन जणांविरूद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ३0२ आणि आर्म अँक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दुसर्‍या गटातर्फे तुषार दिलीप नागलकर याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सागर पुर्णये, अश्‍विन नवले, शैलेश अढाऊ, राहुल खडसान, मंगेश गंगाराम टापरे, आशिष शिवकुमार वानखडे, किशोर सुधाकर वानखडे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३0७, ३२४, २९४, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाDeathमृत्यूOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन