लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे घडलेल्या ऑटो अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोला शहरातील हरिहर पेठेतील ८ ते १0 जण एमएच ३0 एए ५७१४ क्रमांकांच्या ऑटोरिक्षाने राष्ट्रीय महामार्गावरील अंबुजा सोयाबीन फॅक्टरीत कामावर निघाले होते. रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ऑटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ऑटो एमएच २0 सीटी ७२१४ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनावर आदळला. त्यामुळे ऑटोरिक्षातील आठ मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये शे. शहीद, शे. नासीर, शेख अब्दुल अन्सार, अब्दुल जब्बार, शेख अमजद शेख मन्ना, शेख इमरान, शेख समीर शेख हारून (चालक) यांचा समावेश आहे.
अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ऑटोच्या अपघातात आठ मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:39 IST
अकोला : राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे घडलेल्या ऑटो अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अकोला : राष्ट्रीय महामार्गावर ऑटोच्या अपघातात आठ मजूर जखमी
ठळक मुद्देरविवारी सकाळी ७ वाजता रिधोर्याजवळ घडली घटना