शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
4
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
5
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
6
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
7
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
8
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
9
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
10
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
11
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
12
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
13
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
14
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
17
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
18
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
19
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
20
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

अकोला : डॉ. पंदेकृविचे संशोधन : तेलबियांचे सात वाण विकसित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:42 AM

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देराज्यातील क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाने डॉ. एस.एन. देशमुख यांच्या नेतृत्वात टीएजी-२४, एके-१५९,  एके-२६५ व एके- ३0३ भुईमुगाचे वाण विकसित करण्यात आले आहे. सर्व वाण खरीप हंगामात भरघोस उत्पादन देणारी आहेत. एके- २६५ वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले आहे. एके-३0३ भुईमुगाचे वाणही खरीप हंगामासाठी आहे. या भुईमुगाचा एक दाणा एक ग्रामचा आहे, हे विशेष. या वाणाची शेतकर्‍यांकडून मोठी मागणी आहे.  करडीमध्ये पीकेव्ही- पिंक व एकेएल-२0७ हे दोन वाण अलीकडेच विकसित करण्यात आले आहे. करडी पिंक या वाणाचे फूल गुलाबी आहे. हे वाण प्रसारित करण्यात आले. या वाणापासून इतर वाणापेक्षा दोन टक्के अधिक म्हणजे ३३ टक्के तेल मिळते. सूर्यफूल-एसएस हे संकरित वाणही विकसित करण्यात आले आहे. नरनपुंसकतेवर आधारित तेलबिया संकरित वाण निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरू  आहेत. तेलबियांचे संशोधन करू नही क्षेत्र सातत्याने घसरत आहे.  विदर्भात सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न आठ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८0 हजार हेक्टर होते, तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत सहा हजार हेक्टरवर आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर आहे. 

भुईमूग संशोधन प्रकल्पाचा प्रस्तावभुईमुगावर संशोधन करण्यासाठी अखिल भारतीय संशोधन (एआयसीआरपी) प्रकल्पाचा प्रस्ताव भारतीय संशोधन परिषदेकडे कृषी विद्यापीठाने पाठविला आहे. हे केंद्र मिळाल्यास भुईमुगावर आणखी संशोधन करता येईल.

कृषी विद्यापीठाने दज्रेदार भरघोस उत्पादन देणारे तेल बियाणे वाण विकसित केले असून, शेतकर्‍यांची मागणी वाढली आहे. यावर्षी रब्बी हंगामात करडई क्षेत्र वाढले आहे. उन्हाळी भुईमुगाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे.डॉ. विलास खर्चे,संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ