शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:37 IST

अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आगमन झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

ठळक मुद्देमूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील कुरूम व परिसरात दमदार पाऊस झाला.कुरणखेड येथील आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांची दाणादाण उडाली.सायखेड शिवारात वीज पडल्याने धामणदरी येथील सीताराम राठोड यांच्या मालकीचा गोºहा ठार झाला,

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनच्या पावसाचे अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आगमन झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अचानक सायंकाळी आलेल्या पावसामुळे कुरणखेड येथील आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांची दाणादाण उडाली. पावसात व्यापाऱ्यांचा माल वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा होती. रविवारी सायंकाळी मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील कुरूम व परिसरात दमदार पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार, अडगाव, हिवरखेड, बेलखेड परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात तसेच बाळापूर तालुक्यातील लोहारा, वाडेगाव, हातरूण येथे पावसाचे आगमन झाले. बोरगाव मंजू, डोंगरगाव मासा येथे वादळासह जोरदार पाऊस झाला. पातूर तालुक्यातील बेलुरा, आलेगाव, दिग्रस बु. परिसरातही पाऊस झाला. दरम्यान, २२ जून रोजीही जिल्ह्यातील काही भागात वादळवाºयासह जोरदार पाऊस झाला होता.पावसात व्यापाºयांचा माल गेला वाहूनवणी रंभापूर : कुरणखेड येथे रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडी बाजारातील व्यापाºयांचा माल वाहून गेला. अचानक आलेल्या या पावसामुळे ग्रामस्थांचीही एकच धावपळ उाडाली. बाजारात तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक व्यापाºयांचा भाजीपाला, शेवचिवडा व इतर माल पाण्यात वाहून गेला. त्यामुळे व्यापाºयांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबविले नसल्याने बाजारात सगळीकडेच पाणी साचले होते.दोन ठिकाणी कोसळली वीज!बार्शीटाकळी तालुक्यात २२ जून रोजी वादळवाºयासह जोरदार पाऊस झाला. या पावसादरम्यान, सायखेड शिवारात वीज पडल्याने धामणदरी येथील सीताराम राठोड यांच्या मालकीचा गोºहा ठार झाला, तसेच मांगुळ शिवारात विद्युत तारेवर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांबही कोसळले.खूप उशिरा पोहोचलासाधारणपणे विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची तारीख ७ ते ८ जून आहे; परंतु यंदा २३ जून रोजी विदर्भात मान्सून दाखल झाला. गेल्यावर्षी ८ जून रोजी विदर्भात मान्सून धडकला होता. पूर्ण मोसमात ८७५.४ मिमी इतका पाऊस झाला. जो सरासरीपेक्षा ८ टक्के कमी होता. मागील पाच वर्षांत यंदा पहिल्यांदाच विदर्भात सर्वाधिक उशिरा मान्सून सक्रिय झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस