शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे टार्गेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:45 IST

माध्यमिक शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्ष २0१९ मध्ये जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे.

अकोला: इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी आणि दर्जेदार निकाल लागावा, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्ष २0१९ मध्ये जिल्ह्यातील ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे. गतवर्षी ५४0 शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले होते; परंतु जिल्ह्यातील केवळ ५२ शाळांनीच उद्दिष्ट प्राप्त केले.जिल्ह्यातील खासगी, जिल्हा परिषद शाळांसोबतच मनपा, नगर परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे, त्यांच्या निकालात सुधारणा दिसावी, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शाळांना अनेक उपक्रम दिले आहेत. यात गुणवत्ता कक्ष, मदरस्कूल, बायोमेट्रिक उपस्थिती व्यवस्था, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ई-लर्निंग, तंत्रस्नेही शिक्षक, ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, शाळासिद्धीसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. शाळांची शैक्षणिक कामगिरी या उपक्रमांतर्गंत दरवर्षी शाळांना निकालाचे उद्दिष्ट दिल्या जाते. यंदा २0१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी ४७२ शाळांना १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट दिले आहे. २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्रास प्रारंभ होणार आहे. या शैक्षणिक सत्रामध्ये शाळांनी गुणवत्ता व निकाल वाढविण्यावर भर देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी शाळांना इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांचा निकालसुद्धा वाढवावा लागणार आहे. गतवर्षात जिल्ह्यातील ५४0 शाळांपैकी केवळ ५२ शाळांचाच निकाल १00 टक्के लागला होता. उर्वरित शाळा मात्र निकालामध्ये माघारल्या होत्या. यंदा मात्र ही संख्या दुप्पट तरी झाली पाहिजे. यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.  

गतवर्षी शाळांना दिले होते उद्दिष्ट!इ. नववी- १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट- ३९0 शाळाइ. दहावी- १00 टक्के निकालाचे उद्दिष्ट- १५0 शाळा१00 टक्के निकाल लागलेल्या- ५२ शाळा

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणSchoolशाळा