शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात २७ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:08 IST

जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.

अकोला : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. पाणीटंचाईग्रस्त या गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले कोरडेच असून, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त २७ गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका             गावे               टँकरअकोला              २                   २बार्शीटाकळी        ८                  ९अकोट                ३                    ३बाळापूर             ७                   ११पातूर                ६                     ६मूर्तिजापूर         १                    १.............................................एकूण             २७                     ३२जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा!पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार आणि जिल्ह्यातील धरणे आणि जलसाठ्यांमध्ये पुरेसा जलसाठा केव्हा उपलब्ध होणार, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई