शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे सर्चिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 14:00 IST

अकोला: राज्यभरामध्ये अनेक अनधिकृत शाळा सुरू आहेत. या शाळांनी शिक्षण विभागाची परवानगी घेतलेली नाही, अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याने, शिक्षण संचालकांनी प्रत्येक जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचे सर्चिंग करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे सर्चिंग सुरू झाले आहे.

ठळक मुद्देज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निरीक्षण प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नोंदविले. अनधिकृत शाळा कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची फसवणूक करीत आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सूचना देऊनही अनधिकृत शाळा बंद न केल्यास प्रतिदिवस १० हजार रुपयेप्रमाणे शिक्षणाधिकाऱ्यांनी दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले.

 

अकोला: राज्यभरामध्ये अनेक अनधिकृत शाळा सुरू आहेत. या शाळांनी शिक्षण विभागाची परवानगी घेतलेली नाही, अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याने, शिक्षण संचालकांनी प्रत्येक जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचे सर्चिंग करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात अनधिकृत शाळांचे सर्चिंग सुरू झाले आहे.शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर शासन परवानगीशिवाय अनधिकृत सुरू असलेल्या सर्व शाळांचा शोध घेऊन त्यांची अद्ययावत यादी करावी आणि अशा शाळा व्यवस्थापनावर आरटीई तरतुदीनुसार कारवाई करावी, असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अनधिकृत शाळा सुरू असल्याचे निरीक्षण प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नोंदविले. अनधिकृत शाळा कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची फसवणूक करीत आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. शासन परवानगी मान्यता प्रमाणपत्राशिवाय अनधिकृत सुरू असलेल्या शाळांविरुद्ध आरटीईमधील कलम १८ नुसार जर शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगी मान्यता प्रमाणपत्राशिवाय कोणतेही व्यवस्थापन शाळा चालवित असल्यास सदर कायद्यातील कलम १८(५) नुसार कारवाईचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यां ना देण्यात आले आहेत. शासनाची परवानगी न घेता, अनधिकृत शाळा सुरू असल्याचे दिसून आल्यास, शिक्षणाधिकाºयांनी संबंधित अनधिकृत शाळा व्यवस्थापनाकडून १ लाख रुपये दंड आकारावा. सूचना देऊनही अनधिकृत शाळा बंद न केल्यास प्रतिदिवस १० हजार रुपयेप्रमाणे शिक्षणाधिकाऱ्यांनी दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले.या शाळांचे होणार सर्चिंगराज्य मंडळाशी संलग्नित शाळांसाठी शासनाचे परवानगी आदेश व सीबीएसई-आयसीएसई आयबी-आयजीसीएसई-सीआयई आदी मंडळांशी संलग्नित शाळांकरिता शिक्षण विभागााचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे. या आदेशाशिवाय सुरू असलेल्या शाळा तसेच मान्यता काढून घेतली असेल ती शाळा सुरू असल्यास अशा शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित कराव्यात, असे निर्देश आहेत.जिल्ह्यात अनधिकृत शाळा शोधण्याचे काम शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अनधिकृत शाळा आढळून आल्यास, त्यांची यादी तयार करण्यात येईल आणि त्याच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्यात येणार आहे. लवकरच अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येईल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा