शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

अकोला जिल्हा : शौचालये बांधली, पण वापरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:49 AM

अकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले. 

ठळक मुद्देउदासीनता : जिल्ह्यात अनेक शौचालयांचा वापर केला जातो साहित्य ठेवण्यासाठीस्टिंग ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘जहाँ सोच वही शौचालय’ नारा देत ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठीचे उद्दीष्ट्ये संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तथापि अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम केले जात असून, त्या शौचालयांचा वापर काही ग्रामस्थ जळतन व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले. ग्रामीण भागामध्ये गावे हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जिल्हाभरात अनेक ठिकाणी दर्जाहीन शौचालयांची निर्मिती होत आहे. एवढेच नव्हे, तर सरकारी अधिकारी आणि कर्मचारी शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कागदावर शौचालये बांधण्यात येत असली, तरी अनेक गावांमध्ये त्याचा वापरच होत नसल्याचे धक्कादायक चित्र  जिल्ह्यातील ४0 गावांमध्ये समोर आले आहे. ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता अजूनही बदलली नसल्याचे शौचालये बांधलेली असूनही ग्रामस्थ उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. तसेच बांधलेल्या शौचालयांचा वापर साहित्य ठेवण्यासाठी, स्नानगृहांसाठी तर कुठे कुठे चक्क  कोंबड्या ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अकोटमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी २१ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला, तरीही शौचालयांची बिकट अवस्था कायम असल्याचे आढळले. बाळापुरात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाभार्थींचे कागदपत्रेही पाहण्यात आले नाही. शहरात अतिक्रमित जागांवरही शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आगरसह परिसरातील आठ गावांमध्ये शौचालये शो पीस असल्याचे आढळले. वाडी अदमपूरमध्ये शौचालयांचा वापर केवळ अनुदान लाटण्यासाठी केला जात असल्याचे चित्र आहे. व्याळा येथे ४0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामस्थ अजूनही उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. चोहोट्टा बाजार येथे कागदावर शौचालये पूर्ण झाली असल्याचे दाखवण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती गंभीर आहे. अनेकांकडे शौचायचे नसल्याचे समोर आले. मुंडगावात ६0 टक्के शौचालयांची कामे अर्धवट आहेत. तळेगावात खासगी कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे शौचालये पुरवण्यात येत आहेत. हिवरखेडमध्ये १४00 लाभार्थींची यादी मंजूर असली तरी ७00 पेक्षा कमी लाभार्थींनी प्रत्यक्षात शौचलये बांधली आहेत. पिंजरपासून जवळच असलेल्या वडगाव येथे केवळ एका सिमेंटच्या बोरीमध्ये संपूर्ण शौचालयांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा दर्जाचा विचार न केलेला बरा. डोंगरगाव परिसरात अनेक शौचालयांची छतच गायब असल्याचे आढळले. तसेच काही शौचालयांमध्ये अडगळीतील साहित्य ठेवण्यात येत आहे. वल्लभनगर परिसरात अनेक शौचालये कागदावरच पूर्ण दाखवण्यात आली आहे. शिर्ला, लोहारा, निंबा फाटा, वाडेगाव, सायखेड व परिसरातील आठ गावांमध्ये अनेक ग्रामस्थ शौचालयांचा वापरच करीत नसल्याचे चित्र आहे. मधापुरीत अनेक शौचालयांना छतच नसल्याचे चित्र आहे. 

जुन्याच शौचालयांवर लाटले अनुदान!लोहारासह  येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळणारे अनुदान लाटण्यासाठी जुनेच शौचालय दाखवण्यात आले, तर व्याळा येथे २0१५ पूर्वी शौचालय बांधल्यानंतर देण्यात येणार्‍या प्रोत्साहन निधीत मोठा घोळ झाला आहे.निंभोरा येथे ५0 टक्के शौचालयांचेच काम पूर्ण करण्यात आले आहेत. अकोटात अनेक सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. 

ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालयही बंद ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावरही टाकण्यात आली आहे; मात्र सिरसोली ग्रामपंचायतच्या कार्यालयात असलेले शौचालयच वापरात नसल्याचे चित्र आहे. पाइप व इतर साहित्य या शौचालयात ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शौचालयांचा वापर जळतन ठेवण्यासाठी, इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण