शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 14:18 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, या आठवड्यात जवळपास पन्नासच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, या आठवड्यात जवळपास पन्नासच्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील किमान दहा पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.२०१४ च्या निवडणुकीवेळी जिल्ह्यात कार्यरत असलेले किंवा मूळ अकोला जिल्ह्याचे रहिवासी असलेले तसेच तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाºयांच्या बदल्या करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती; मात्र २०१४ च्या निवडणुकीवेळी कार्यरत असल्याची अट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नऊ पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे मिळून ५० अधिकाºयांच्या बदल्या होणार आहेत. बदलीनंतर तेवढेच नवीन पोलीस अधिकारी शहरात येणार आहेत. २२ जानेवारी रोजी पोलीस प्रशासनाला लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. यात लोकसभा निवडणुकीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे, अशा अधिकाºयांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदलीपात्र असलेल्या संबंधित सर्वांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात येणार असून, त्यांच्या पसंतीची तीन ठिकाणे कळविण्याबाबत त्यांना सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. १ जून २०१५ ते ३१ मे २०१७ या कालावधीत पोटनिवडणूक झालेल्या ठिकाणावरील अधिकाºयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नव्या निकषामुळे बदलीच्या कचाट्यात सापडलेले अनेक अधिकारी बचावले आहेत. आयोग व पोलीस महासंचालकांकडून दिलेल्या आदेशानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्या आधीच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून अधिकाºयांना बदलीच्या जागी रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस